चिमूर चंद्रपूर बस उलटली सहा गंभीर, 12 प्रवासी किरकोळ जखमी, वाहक दगावला.

चिमूर चंद्रपूर बस उलटली सहा गंभीर, 12 प्रवासी किरकोळ जखमी, वाहक दगावला.

आधुनिक केसरी न्यूज

वरोडा : दि. 5/8/2025 चिमूरहून चंद्रपूरला जाणारी राज्य परिवहन महामंडळाची चिमूर चंद्रपूर ही बस आज पाच ऑगस्ट रोज मंगळवारला दुपारी दोनच्या सुमारास रस्त्याच्या खाली घसरली. यामुळे बसमधील सहा तर  बारा प्रवासी किरकोळ जखमी झाले असून बसचा वाहक मात्र दगावला.

ही घटना चंद्रपूर वरोडा राष्ट्रीय महामार्गावर चारगाव खुर्द समोरील एका वळणावर घडली. याबाबत मिळालेल्या वृत्तानुसार चिमूर आगाराची बस क्रमांक एम एच ४० ए क्यू ६१८१ ही चिमूर वरून चंद्रपूरला जात होती. चारगाव खुर्द या गावासमोरील एका वळणावर समोरून भरधाव आलेल्या ट्रॅव्हल्स मुळे बसचा चालक सुनील सुधाकर कुसनाके वय 37 राहणार वरोडा याचे बस वरील नियंत्रण सुटले. यामुळे बसचे स्टेरिंग लॉक झाले व बस रस्त्याच्या खाली घसरली अशी माहिती बसच्या चालकाने दिली.
या बस मध्ये जवळपास 25 प्रवासी असल्याचे समजते. यापैकी चालकासह बसमधील 19 प्रवासी  जखमी झाले असून जखमींना रुग्णवाहिकेतून वरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. जखमी पैकी शकील शेख आडेगाव, शाहीन शेख राहणार गडचांदूर, वासुदेव शेडमाके राहणार वायगाव भोयर, वसंता देठे बल्लारशा, ईश्वर चिंचोळकर राहणार धामणी संजय कोवे राहणार घुग्गुस या सहा गंभीर प्रवाशांना चंद्रपूर येथील सार्वजनिक रुग्णालय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.मात्र बसचा वाहक सुरेश भटारकर राहणार राजुरा हा या अपघातात दगावला. 

रेखा श्रीरामे राहणार चंद्रपूर, सुमन बालूदे लोधीखेडा, कांताबाई नवले भिसी, शामकला दडमल सुमठाणा, भरत चिंचोळकर चिमूर,वनिता दडमल चिमूर, मधुकर चिंचोलकर चिमूर, मालती कापसे चिमूर, सोमाबाई चिंचोलकर धामणी,स्नेहा वाजुरकर इंदिरानगर चंद्रपूर, सदाशिव मून बल्लारशा या जखमींवर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात झाल्याचे वृत्त कळतच राज्य परिवहन महामंडळाच्या वरोडा आगाराचे आगर प्रमुख वर्धेकर हे घटनास्थळी पोहोचले असून घटनेचा पंचनामा करीत आहे. अपघात झाल्यानंतर बसचा चालक स्वतःहून  शेगाव येथील पोलीस स्टेशन मध्ये पोहोचला व त्यांनी घटनेची तक्रार पोलीस स्टेशनला नोंदविली. शेगाव पोलीस घटनेचा तपास करीत आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

मुरबाड तालुक्यातील तळ्याची वाडी येथे बिबट्याचा वावर,नागरिकांनी काळजी घ्यावी घाबरून जाऊ नये - सुरेश बांगर मुरबाड तालुक्यातील तळ्याची वाडी येथे बिबट्याचा वावर,नागरिकांनी काळजी घ्यावी घाबरून जाऊ नये - सुरेश बांगर
आधुनिक केसरी न्यूज शंकर करडे मुरबाड : तालुक्यातील तळ्याची वाडी येथे बिबट्या आल्याची घटना तेथील आदिवासी बांधवांनी सांगितले पुढे त्यांनी...
लोढा व अदानींच्या मुंबईतील इमारतीमध्येच आदर्श कबुतरखाना उभारा: हर्षवर्धन सपकाळ
शरदचंद्र पवार गटाचे माजी आमदार राहुल मोटे यांनी हाती बांधले घड्याळ;अजितदादा पवारांनी केले स्वागत..!
भाजपचे राजू जाजूर्ले यांच्यावर हल्ला एकार्जुना चौकातील घटना
चिमूर चंद्रपूर बस उलटली सहा गंभीर, 12 प्रवासी किरकोळ जखमी, वाहक दगावला.
मुदखेड मध्ये कुरेशी समाजाचा तहसील कार्यालयावर मोर्चा..!
संपूर्णता अभियानात उत्कृष्ट कामगिरीबद्दल  चंद्रपूर जिल्हाधिकारी विनय गौडा सन्मानीत