वरोडा भद्रावती विधानसभेत राजकीय सुरुंग ; शिवसेना जिल्हाप्रमुख पदासाठी काँग्रेसचे राजू महाजन यांची फिल्डिंग

वरोडा भद्रावती विधानसभेत राजकीय सुरुंग ; शिवसेना जिल्हाप्रमुख पदासाठी काँग्रेसचे राजू महाजन यांची फिल्डिंग

आधुनिक केसरी न्यूज

वरोडा : शिवसेनेच्या  जिल्हाप्रमुख पदासाठी बरीच रस्सीखेच चालू असताना काँग्रेसचे नेते राजू महाजन यांचे नाव शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदासाठी चर्चेत आल्याने शिवसैनिकात खळबळ माजली आहे. राजू महाजन हे जिल्हाप्रमुख झाल्यास पुन्हा शिवसेनेच्या राजकारणात प्रलय येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

    शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रवींद्र शिंदे यांच्या भाजप प्रवेशानंतर  शिवसेनेच्या ऊबाठा जिल्हाप्रमुख पदासाठी रस्सीखेच चालू झाली आहे. रवींद्र शिंदे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर विदर्भ संपर्क प्रमुख प्रशांत कदम यांनी वरोडा व भद्रावती येथे भेट दिली व कट्टर सैनिकांशी चर्चा नवीन जिल्हा प्रमुखाच्या नावाबद्दल चर्चा केली. ही चर्चा करत असताना शिवसैनिकांनी पक्षातील कट्टर शिवसैनिकांनाच हे पद देण्यात यावे.बाहेरच्या व्यक्तीस देऊ नये अशा प्रकारच्या आपल्या भावना बोलून दाखवल्या होत्या. या भेटीचा अहवाल प्रशांत कदम यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे आपण देणार असल्याचेही सांगितले होते. 

रवींद्र शिंदे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र म्हटल्यानंतर प्रशांत कदम यांच्या उपस्थितीत झालेल्या शिवसैनिकांच्या बैठकीत मनीष जेठाणी, वैभव डहाणे, भास्कर ताजणे, नंदू पडाल,दत्ता बोरेकर,ज्ञानेश्वर डुकरे या कट्टर शिवसैनिकांची नावे जिल्हा प्रमुख पदांसाठी समोर आली.मात्र ही नावे चर्चेत असताना आता राजू महाजन यांचे नाव चर्चेत आल्याने शिवसैनिक गोंधळले आहेत.
            येत्या नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पक्षाला स्थिरत्व प्राप्त करून देण्यासाठी योग्य जिल्हा प्रमुखाची निवड होणे शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. शिवसेनेतील आक्रमक बाणा कोणत्या नेत्याकडे आहे . जनसामान्याचे काम कोण करू शकते. कट्टर शिवसैनिक कोणत्या जिल्हाप्रमुखांना पसंती दाखवतो या सर्व बाबींकडे लक्ष देऊन शिवसेना नेते चंद्रपूर जिल्ह्यातील रणनीती आखत आहे. 
मात्र बरेच दिवसे लुटूनही शिवसेनेसाठी जिल्हाप्रमुख पद अजून पर्यंत रिक्तच आहे. त्यामुळे शिवसैनिकांच्या एकत्रीकरणासाठी जिल्हाप्रमुख म्हणून राजू महाजन  नावाचा विचार केला जात आहे. मात्र हे नाव कट्टर शिवसैनिकांना कितपत पचनी पडेल हे सांगणे कठीण आहे.

स्थानिक नेते राजू महाजन यांनी तीन प्रमुख राजकीय पक्षांतर्गत केलेला समर्पक प्रवास हा मुद्दा शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांना विचारात घ्यावा लागेल. 
राजू महाजन यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे  जिल्हा उपाध्यक्ष म्हणून महाविद्यालयीन स्तरावर निवडणुका ताकदीने लढवल्या.  
वरोडा नगरपालिका निवडणुकीत पत्नीला राष्ट्रवादी तिकिट मिळवून दिले आणि त्या *नगरसेविका* म्हणून निवडून आल्या.  
      मात्र नंतर राष्ट्रवादीत पक्षभेदामुळे उद्भवलेल्या वादानंतर खासदार हंसराज अहीर यांच्या आमंत्रणावरून राजू महाजन यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये आल्यानंतर आपली *तालुका महामंत्री** म्हणून नियुक्ती करून घेण्यात ते यशस्वी झाले. यानंतर झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीत 
पत्नीला पुन्हा भाजपतर्फे उमेदवारी मिळवून दिली व त्यांना निवडून आणले.वरोडा नगरपालिकेच्या *एकमेव विजयी उमेदवार* ठरल्या आणि राजू महाजन यांना *स्वीकृत सदस्य* पद  आपल्या पदरात पाडून घेतले.
    या कामगिरीनंतर नंतर त्यांचेवर *भाजप तालुका संघटक* पदाची जबाबदारी सोपविण्यात आली.  

    या घडामोडी घडत असताना शिवसेनेचे तत्कालीन जिल्हा प्रमुख बाळूभाऊ धानोरकर यांची "आक्रमक आंदोलनशैली" आणि "न्यायदानाच्या ध्येयाने" प्रेरित होऊन राजू महाजन यांनी शिवसेनेत प्रवेश केला.  
   शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर पक्षाच्या आदेशानुसार *वरोरा नगरपालिका निवडणूक प्रभारी* म्हणून काम पाहिले.  
या नंतर झालेल्या नगर परिषदेच्या  निवडणुकीत शिवसेनेचे *९ उमेदवार निवडून आणण्यात ते यशस्वी झाले आणि महाजन पुन्हा स्वीकृत सदस्य* बनले. हे सर्व होत असताना शिवसे शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख बाळू धानोरकर यांनी लोकसभेच्या तोंडावर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला रामराम करत काँग्रेसमध्ये प्रवेश गेल्यानेही राजू महाजन हे काँग्रेसमध्ये गेले. परंतु शिवसेनेत असताना मुंबई येथील शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांना राजू महाजन यांच्या असलेले संघटन कौशल्य,त्यांची काम करण्याची पद्धत, आक्रमकता यांची जाण आहे. त्यामुळेच त्यांच्या नावाची चर्चा वरिष्ठ सूत्रावरूनच झाल्याचे बोलल्या जात आहे.शिवसेनेतर्फे हा सगळा अहवाल शिवसेनेच्या वरिष्ठांकडे पाठवण्यात आला असून या नावाचा विचार शिवसेना करीत असल्याची माहिती मिळत आहे. याशिवाय आणखीन काही नवीन नावे समोर येण्याची शक्यता आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग विद्यार्थ्यांना भोजनदान; शिवसैनिकांचा सेवाभाव  उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग विद्यार्थ्यांना भोजनदान; शिवसैनिकांचा सेवाभाव 
आधुनिक केसरी न्यूज वरोडा : शिवसेना (उबाठा) चे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  यांच्या वाढदिवसानिमित्त आज २७ जुलै रोज गुरुवारला वरोडा-भद्रावती विधानसभा...
श्रीक्षेत्र मार्कंडेश्वर’ माहितीपटाला सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद तब्बल ५.५३ लाख व्ह्युव 
वरोडा भद्रावती विधानसभेत राजकीय सुरुंग ; शिवसेना जिल्हाप्रमुख पदासाठी काँग्रेसचे राजू महाजन यांची फिल्डिंग
आ.सुधीर मुनगंटीवार यांनी साताऱ्याचा मानसन्मान ठेवला
छत्रपती संभाजीनगर मध्ये गुन्हेगारीचा कहर! मोटारसायकल, मोबाईल लंपास ; चोरट्याना कुठेय पोलिसांचा धाक 
गारखेडा कारगिल उद्यानात कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा
गोंदियात पावसाचे थैमान जिल्हा प्रशासन अलर्ट  जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर