काँग्रेस कमिटीच्या सेनगाव तालुकाध्यक्ष पदाची धुरा डॉ निळकंठ गडदे यांच्या खांद्यावर

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले निवडीचे पत्र  

काँग्रेस कमिटीच्या सेनगाव तालुकाध्यक्ष पदाची धुरा डॉ निळकंठ गडदे यांच्या खांद्यावर

आधुनिक केसरी न्यूज

हिंगोली : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ यांच्या आदेशानुसार हिंगोली जिल्ह्यातील तालुक्याच्या कार्यकारणी जाहीर करण्यात आल्या यामध्ये सेनगाव तालुक्यातील ब्रम्हवाडी येथील काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून परिचित असलेले सेनगाव पंचायत समितीचे माजी सभापती 
डॉ निळकंठ लक्ष्मणराव गडदे यांची सेनगाव तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली ही निवड  प्रदेश उपाध्यक्ष एडवोकेट गणेश पाटील यांच्या आदेशाखाली करण्यात आली.

या निवडीबद्दल डॉ निळकंठराव गडदे म्हणाले की येणाऱ्या काळात सेनगाव तालुक्यात काँग्रेसचे संघटन गाव पातळीवर तसेच सर्कलनिहाय जुन्या व नव्या कार्यकर्त्यांची सांगड घालून पक्ष संघटना बळकट करणार आहे व सर्व 18 पगड जातीतील समाजाला काँग्रेस पक्षात घेऊन पक्षाची मोठी ताकत उभी करून काँग्रेस पक्षाला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत गतवैभव प्राप्त करून देणार असल्याचे त्यांनी म्हटले व सेनगाव तालुक्यातील सर्व निवडणुका महाविकास आघाडी न झाल्यास दहा जिल्हा परिषद वीस पंचायत समिती गणात तगडे उमेदवार देऊन काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवणार असल्याचे काँग्रेसचे सेनगाव तालुक्याचे नूतन तालुकाध्यक्ष 
डॉ निळकंठराव गडदे यांनी सांगितले.

डॉ निळकंठ गडदे हे मागील वीस वर्षापासून काँग्रेसचे एकनिष्ठ व निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांची  ओळख आहे तसेच सेनगाव तालुक्यातील ओबीसी समाजाची संख्या पाहता त्यांना हे पद दिल्याचे बोलले जात आहे त्यांच्या निवडीमुळे काँग्रेसला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ओबीसी  मतदार पक्षात वळणार असल्याचे बोलले जात आहे.

या निवडीबद्दल विधानपरिषद आमदार प्रज्ञाताई राजिव सातव काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा हिंगोली जिल्हा प्रभारी अँड सचिन नाईक विनायकराव देशमुख शामराव जगताप  अब्दुल हाफिज साहेबराव देवकते नगरसेवक अनिल नैनवाणी माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव मस्के यांच्यासह अनेक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी त्यांना निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

काँग्रेस कमिटीच्या सेनगाव तालुकाध्यक्ष पदाची धुरा डॉ निळकंठ गडदे यांच्या खांद्यावर काँग्रेस कमिटीच्या सेनगाव तालुकाध्यक्ष पदाची धुरा डॉ निळकंठ गडदे यांच्या खांद्यावर
आधुनिक केसरी न्यूज हिंगोली : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ यांच्या आदेशानुसार हिंगोली जिल्ह्यातील तालुक्याच्या कार्यकारणी जाहीर करण्यात...
पुणे जिल्ह्यात राजकीय भुंकप काँग्रेसला धक्का, आमदार संजय जगताप यांचा पुणे जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदाचा तसेच काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण; कोणत्या पक्षात प्रवेश करणार?
पत्रकार अविनाश तराळ यांचा प्रामाणिकपणा : सापडलेले २० हजार रुपये केले परत
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत भांगडीयांचाच भांगडा तर जोरगेवारांचाच जोर 
१३ वर्षांनंतर पार पडलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत भाजपचे वर्चस्व.
वकील संघाच्या अध्यक्ष पदी अशोक मुळे यांचा विजय
उजनी धरण ९४ टक्के भरलं, धरणातून भिमा नदीत १६ हजार क्युसेसने पाण्याचा विसर्ग