चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत भांगडीयांचाच भांगडा तर जोरगेवारांचाच जोर
अध्यक्षपदासाठी भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरस
आधुनिक केसरी न्यूज
चंद्रपूर : जिल्ह्यामध्येच नव्हे तर नोकर भरती प्रकरणाने अवघ्या महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नाव चांगलेच चर्चेत आले. त्यामुळे या बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये यावेळेस प्रथमच जिल्ह्यातील सर्वच खासदार, आमदार यांनी जोरदार शर्थीचे प्रयत्न चालवले होते. तब्बल तेरा वर्षानंतर या बँकेची निवडणूक प्रक्रिया पार पडली. परस्पर विरुद्ध विचारधारा असणाऱ्या राजकीय पक्षांचे एकत्रिकरण, सभासदांची पळवापळवी, काँग्रेसचे खासदार व भाजपाचे आमदार यांचा एकाच गाडीतील प्रवास, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विठ्ठलाच्या मंदिरामध्ये काँग्रेस च्या वरिष्ठ नेत्यांचे दिखाऊ मनोमिलन, धक्कादायक घडामोडी या सगळ्यामुळे या निवडणुकीकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलं होतं.
अखेर या निवडणुकीमध्ये चिमूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार कीर्ती कुमार उर्फ बंटी भांगडिया यांचाच भांगडा तर चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर जोरगेवार यांचाच जोर दिसून आला. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे २१ पैकी १२ संचालक अविरोध निवडून आल्याने उर्वरित ९ जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल शुक्रवारी (दि.११ जुलै ला ) मतमोजणीअंती जाहीर झाला. अतिशय चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत भाजपने पहिल्यांदाच सिडिसीसी बँकेत जोरदार मुसंडी मारत धमाकेदार एन्ट्री केली आहे. भाजपकडून ११ जागांवर दावा केला जात आहे, तर काँग्रेसकडून १२ जागांवर दावा केला जात आहे. काही संचालकांवर दोन्ही पक्षांकडून दावा केला जात असल्याने अध्यक्षपदाच्या निवडणुकीची चुरस वाढली आहे. या चुरशीमध्ये भाजप आणि काँग्रेस अशा दोघांनीही आमची सत्ता बसेल असे दावे प्रती दावे करणे सुरू केले आहे. या निवडणुकीत काँग्रेसकडून पक्षाचे विधिमंडळ नेते आमदार विजय वडेट्टीवार, खासदार प्रतिभा धानोरकर यांची, तर भाजपकडून आमदार बंटी भांगडिया आणि किशोर जोरगेवार यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली होती.
चंद्रपूर तालुका अ गटात दिनेश चोखारे यांनी माजी संचालक सुभाष रघाताटे यांचा अवघ्या एका मताने पराभव केला. मतदानाच्या दिवशी या दोन उमेदवारांच्या समर्थकांमध्ये एका मतदारावरून चांगलाच वाद झाला होता. राजुरा तालुका अ गटात माजी आमदार सुदर्शन निमकर आणि नागेश्वर ठेंगणे या दोघांनाही नऊ मते मिळाल्याने निमकर यांचा ईश्वर चिठ्ठीने विजय झाला. उल्लेखनीय, ठेंगणे उच्च न्यायालयात गेल्याने निमकर यांचा अर्ज बाद झाला होता. या निर्णयाला निमकर यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत आपली उमेदवारी कायम राखल्याने ही निवडणूक झाली.
गट ब २ मधून राजकीय पार्श्वभूमी नसलेले रोहित बोम्मावार (२१३ मते) यांनी किशोर ढुमणे (६२) यांचा तब्बल १५१ मतांनी पराभव केला. विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातून माजी उपाध्यक्ष यशवंत दिघोरे (३७२) यांनी दामोधर रुयारकर (२६६) यांचा १०६ मतांनी पराभव केला. अनुसूचित जाती जमाती मतदारसंघात ललित मोटघरे (५३२) यांनी प्रशांत बांबोडे (२६४) यांचा २६८ मतांनी पराभव केला. कोरपना तालुका अ गटात माजी आमदार सुभाष धोटे यांचे बंधू माजी संचालक शेखर धोटे यांनी माजी संचालक विजय बावणे यांना पाठिंबा दिल्याने बावणे यांचा सहज विजय झाला. वरोरा तालुका अट गटात जयंत टेंमुर्डे (३९) यांनी डॉ. विजय देवतळे (२३) यांचा १६ मतांनी पराभव केला. सिंदेवाही तालुका अ गटात निशिकांत बोरकर (१२) यांनी प्रकाश बन्सोड (८) यांचा चार मतांनी पराभव करून विजय संपादन केला. इतर मागास गटातील उमेदवार धानोरकर यांच्यासह १२ संचालक बिनविरोध निवडून आले आहेत. यामध्ये माजी अध्यक्ष संतोषसिंह रावत व रवींद्र शिंदे यांच्यासह संदीप गड्डमवार, विलास मोगरकार, डॉ. अनिल वाढई, संजय डोंगरे, उल्हास करपे, गणेश तर्वेकर, दामोदर मिसार, आवेश पठाण, नंदाताई अल्लूरवार यांचा समावेश आहे.
गजानन पाथोडे आणि शामकांत थेरे यांच्यात अटीतटीचा सामना झाला. पाथोडे यांचा अवघ्या दोन मतांनी विजय झाला. त्यामुळे फेर मतमोजणीची मागणी करण्यात आली. दोनदा फेरमतमोजणीतहीअखेर गजानन पाथोडे यांची दोन मतांची आघाडी कायम राहिली , बँकेच्या इतिहासात पहिल्यांदाच खासदार संचालक चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या इतिहासात पहिल्यांदाच चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा मतदारसंघाच्या
कार्यकर्त्यांनी सतरंज्याच उचलायच का ??
चंद्रपूर : लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका लढणारे आमदार, खासदारच जर आता बँकांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा उभे राहायला लागले तर, पक्षाचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काय फक्त सतरंज्या उचलणे आणि बॅनर बांधण्या पुरताच कायम पक्षात राहायचं का? अशी चर्चा या चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतल्या आमदार खासदारांच्या अतिशय जास्त सक्रिय सहभागामुळे चंद्रपुरात व्हायला लागली आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List