बारामती-पारवडी मार्गावर समोरा समोर धडक मायलेकीचा जागीच मृत्यू! पती आणि मुलगा गंभीर जखमी!

बारामती-पारवडी मार्गावर समोरा समोर धडक मायलेकीचा जागीच मृत्यू! पती आणि मुलगा गंभीर जखमी!

आधुनिक केसरी न्यूज 

निलेश मोरे

भिगवण : दि.५काल रात्री बारामती पारवडी मार्गावर दुचाकी आणि चारचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीवरील पती-पत्नी आणि दोन मुलं गंभीर जखमी झाले. यात पत्नी आणि मुलीचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला असून पती आणि मुलगा गंभीर जखमी अवस्थेत आहे.

पाच वर्षाची सानवी मयूर कोकणे व तिची आई रूपाली मयूर कोकणे या दोघींचा या घटनेत दुर्दैवीरित्या मृत्यू झाला असून, मयूर कोकणे व त्यांचा दोन वर्षाचा मुलगा या घटनेमध्ये गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी दवाखान्यात तातडीने हलवण्यात आले आहे. ही घटना काल रात्री उशिरा बारामती पारवडी रस्त्यावर घडली.

दुचाकीवरून कोकणे कुटुंब बारामतीकडून पारवडीच्या दिशेने चालले होते. याच वेळी बारामती कटफळ पारवडी मार्गावर परीट वस्ती लगत खडकी कडून बारामतीच्या दिशेने येणाऱ्या चारचाकी वाहनाची दुचाकीला जोरदार धडक बसली. या घटनेत मायलेकीचा मृत्यू झाला तर ग्रामस्थांनी तातडीने धावपळ करत गंभीर जखमी झालेल्या मयूर कोकणे व त्यांच्या दोन वर्षाच्या मुलाला दवाखान्यामध्ये नेले. अपघात झाल्यानंतर चारचाकी वाहन चालकाने गाडी तेथेच सोडून पलायन केल्याची प्राथमिक माहिती आहे. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोचून पंचनामा केला व वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. दरम्यान या घटनेमुळे या रस्त्यावरील वाहतूक किती धोकादायक पातळीवर पोहोचली आहे याचा अंदाज आला असून नागरिकही हतबल झाले आहेत.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

भीम जयंती मिरवणुकीत वाहन घुसल्याने एकाचा मृत्यू.एक जखमी भोकर येथील घटणा भीम जयंती मिरवणुकीत वाहन घुसल्याने एकाचा मृत्यू.एक जखमी भोकर येथील घटणा
आधुनिक केसरी न्यूज  भोकर :  रविवारी ( ता.२६) भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती निमित्त मिरवणूक काढण्यात आली होती.रात्री ९...
​गोंदियात उपवर्गीकरणा विरोधात भीमगर्जना, बदर समितीचा अहवाल सार्वजनिक करण्या
तिहेरी खुन प्रकरणातील मुख्य सुत्रधार साई गँगचा सुत्रधार, साई उर्फ साईलाला गहेरवार व  नितेश इंगळे यास वाराणसीत अटक 
Breking News : भ्रष्टाचारी चार आयएएस अधिकाऱ्यांचे प्रकरण उघड करणार : नाना पटोले 
खासदार प्रतिभा धानोरकर यांनी राजमाता राणी हिराई सोहळ्याला गालबोट लावले ; आदिवासी समाजाच्या वतीने तीव्र निषेध
हडसणी फाट्यावर भीषण अपघात, भरधाव कारने दोन दुचाकींना उडवले ४ जण ठार : एकाची प्रकृती चिंताजनक
महिला आरक्षणावर खुल्या चर्चेस काँग्रेस तयार; मुख्यमंत्र्यांनी सांगावे कधी व कुठे चर्चा करायची? मोदींनाही चर्चेला बोलवा: खा. प्रणिती शिंदे