मुदखेड मध्ये कुरेशी समाजाचा तहसील कार्यालयावर मोर्चा..!
आधुनिक केसरी न्यूज
मुदखेड : कुरेशी समाजावर होत असलेल्या अन्याया विरोधात कायदेशीर संरक्षण,स्पष्ट शासकीय नियमावली, कुरेशी समाजाला शासकीय स्लॉटर हाऊस,आणि व्यवसायाच्या हक्कासाठी दि:०४ ऑगस्ट रोजी सर्व कुरेशी समाजातर्फे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. कुरेशी समाज हा महाराष्ट्र राज्यात पारंपारिक व कायदेशीर मार्गाने बैल, म्हैस, शेळी इत्यादी जणावरांची खरेदी-विक्री व शेती व्यवसायासाठी नेहमी वाहतूक करीत असतात.तसेच कुरेशी समाज अतिशय शांत स्वभावाचा असून कायद्याचे पालन करणारे लोक आहेत.त्यांच्या कडे उत्पन्न बाजार समितीचे परवाने (जनावरचे दाखले ) वैद्यकीय प्रमाणपत्र तसेच वाहतुकी परवाने आदी सर्व कागदपत्रे असतात. तरी काही स्वयंगोषित संघटना व स्थानिक घटक या कुरेशी समाजावर जाणून बुजून अन्याय करून त्या समाजाच्या लोकांच्या रस्त्यावर गाड्या अडवून जातीवाचक व अश्लील भाषेत शिवीगाळ करून मारहाण करून पैसे उकळले जातात,आणि खोटे गुन्हे दाखल केले जातात.बेकायदेशीररित्या कोणत्याही प्रकारे चोकशी न करता एफ. आय.आर.दाखल करणे न्यायालयाचे आदेश असून सुद्धा जनावरे परत न करणे.कुरेशी समाजाला शासनाने नियमानुसार स्लॉटर होउसेस स्थापन करून देणे, कुरेशी समाजावर होणारे दिवसेंदिवस गोरक्षकाडून होत असलेले त्रास यांना प्रतिबंध करावे.कुरेशी समाज व खरेदी-विक्री करणारे लोक आणि शेतकरी बांधव यांच्या वाहतुकीमध्ये बजरंग दलाच्या लोकांनी कोणत्याही प्रकारे अडवणूक न करणे आंणी कायदा हातात न घेणे त्याबाबत संरक्षण देणे. तसेच पोलीस प्रशासनाने सदरील वाहतुकीची सखोल चौकशी करून ती जनावरे हे कत्तल साठी नसून ते जनावरे खरेदी विक्रीची आहेत अथवा शेतकरी शेतीकामासाठी आणलेले आहेत हे चौकशी करूनच कार्यवाही करावी.म्हणून कुरेशी समाजाने मागील १९ तारखेपासून व्यवसाय बंद केले आहेत व खरेदी विक्री व्यापार आंणी जनावर बाजारपेठ देखील बंद केलेली आहे व बेमुदत संप पुकारला आहे.अशा प्रकारे सर्व तालुक्यातील कुरेशी समाजाच्या वतीने तहसीलदार साहेबांना निवेदन दाखल करण्यात आलेलं आहे. त्यावेळी अनेक समाजबांधव तेथे उपस्थित होते, तसेच सामाजातील जेष्ठ प्रतिनिधी मुसा कुरेशी, गौस कुरेशी, इकबाल कुरेशी व इतर समाजबांधव जलील सेट, गफार सेठ, मोहमद हुसैन आदींची उपस्थिती होती.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List