दरोड्यात सहभागी तिघे अट्टल गुन्हेगार अटकेत देऊळगाव राजात स्था.गुन्हे शाखेची सिनेस्टाईल कारवाई..!
आधुनिक केसरी न्यूज
देऊळगाव राजा : बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर सह इतर ठिकाणी दरोडा,घरफोड्या, दुचाकी चोरी अशा विविध गुन्ह्यात पोलिसांना हवे असलेल्या तिघा अटल गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा च्या पथकाने मंगळवारी (ता.५) देऊळगाव राजा येथून सिनेस्टाईल अटक केली.आरोपींनी अनेक गुन्ह्या बाबत पंचा समक्ष कबुली दिली असून पाच पैकी तिघा आरोपींना मेहकर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. दरम्यान आरोपकडून दे. राजा हद्दीतील अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे
याबाबत स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक ५ ऑगस्ट रोजी देऊळगाव राजा हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय खात्री लायक खबरेनुसार मेहकर सह जिल्ह्यातील इतर ठिकाणी ज्वेलर्स वर दरोडा, घरफोड्या, दुचाकी चोरी अशा विविध गुन्ह्यांमध्ये रेकॉर्डवर देऊळगाव राजा येथील आरोपी नामे हिरासिंग बावरे व त्याचे साथीदार यांचा सहभाग आहे. या खबरे वरून हिरासिंग बावरे याचा शोध घेत असता शहरातील ग्रामीण रुग्णालयासमोर हिरासिंग हा पोलिसांना दिसला. यावेळी पोलिसांना पाहून पळून जात असताना हेडकॉन्स्टेबल दिगंबर कपाटे यांनी त्याचा पाठलाग करून गीतांजली टॉकीज समोर असलेल्या नंदन एजन्सी जवळ सिनेस्टाईल पकडले.सदर आरोपीस ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने पंचा समक्ष मेहकर पोलीस स्टेशन अंतर्गत २४ ऑगस्ट २०२४ आणि देऊळगाव राजा पोलीस ठाणे अंतर्गत २० मार्च २०२५ रोजी दाखल झालेल्या गुन्ह्यात सहभाग असल्याची कबूली दिली. स्थानिक गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार या गुन्ह्यामध्ये सतनाम सिंग उर्फ अजयसिंग चंदासिंग बावरे,रा.दे.राजा, तकदीर सिंग टिटू सिंग रा. जालना, रोशनसिंग बबलूसिंग टाक रा. संजय नगर दे.राजा, धर्मेंद्रसिंग टाक राहणार बीबी व जोगिंदरसिंग रणजीतसिंग टाक रा वसमत या पाच जणांचा समावेश असून सदर गुन्ह्यातील आरोपी हिरासिंग मोहन सिंग बावरे,वय २० रा सरकारी दवाखाने मागे, सतनाम सिंग उर्फ अजय सिंग चंदनसिंग बावरे वय ३८ व रोशन सिंग टाक वय २० तिघे राहणार देऊळगाव राजा यांना अटक करण्यात आली. सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड व श्रेणिक लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर स्था गुन्हे शाखा बुलढाणा यांच्या निर्देशाने पीएसआय प्रताप बाजड, अविनाश जायभाये, एएसआय ओम प्रकाश सावळे, हेडकॉन्स्टेबल दिगंबर कपाटे, शरद गिरी, पुरुषोत्तम आघाव, महिला कॉन्स्टेबल वनिता शिंगणे, पोलीस कॉन्स्टेबल दीपक वायाळ, चालक कॉन्स्टेबल विकास देशमुख यांच्या पथकाने केली. दरम्यान तिघा आरोपींना मेहकर पोलीस ठाण्याच्या भागात देण्यात आले असून आरोपीकडून देऊळगाव राजा हद्दीतील अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List