कोठारी पुलालगत चा रस्ता खचला; प्रतीक केराम यांचे कंत्राटदारास रस्ता दुरुस्तीचे निर्देश
आधुनिक केसरी न्यूज
लक्ष्मीकांत मुंडे
किनवट : तालुक्यातील कोठारी ते शनिवारपेठ जोडणारा महत्त्वाचा रस्ता शनिवारी रात्रीच्या मुसळधार पावसामुळे व ढगफुटी सदृश्य परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात खचला. अचानक रस्त्याचा भाग वाहून गेल्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. रात्रीभर सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे परिसरात नाल्यांना पूर आला. परिणामी रस्त्याचा मोठा भाग पाण्यासोबत वाहून गेला.
शनिवारी दुपारीच ऍडव्होकेट प्रतीकदादा केराम, माजी नगराध्यक्ष आनंददादा मच्छेवार,तालुका शहरअध्यक्ष स्वागत आयनेनिवार तसेच स्थानिक जनप्रतिनिधी, कार्यकर्ते व सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. या वेळी त्यांनी रस्त्याची दुरुस्ती तातडीने करण्याचे आदेश संबंधित कॉन्ट्रॅक्टरला दिले. तसेच नागरिकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने काळजी घेण्याचे आवाहनही केले. तसेच यावेळी अधिकाऱ्यांना देखील इतरत्र झालेल्या नुकसानीचे पंचनामे त्वरित करण्याचे निर्देश देण्यात आले. शेतजमिनीतील पिकांचे झालेले नुकसान, घरात शिरलेले पाणी आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान याचा अहवाल तयार करून मदत कार्यवाही सुरू करण्याचे आदेश दिले. दरम्यान, जोरदार पावसामुळे कोठारी, शनिवारपेठ परिसरात अजूनही मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून स्थानिक प्रशासनाने नागरिकांना नदी व नाल्यालगत जाण्याचे टाळण्याचे आवाहन केले आहे. स्थानिकांची मागणी – रस्ता हा कोठारी–शनिवारपेठ दरम्यान दळणवळणाचा प्रमुख मार्ग असल्याने त्याची दुरुस्ती तातडीने करून वाहतूक सुरळीत करावी, अशी एकमुखी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List