भिगवण शहरामध्ये दहीहंडीचा उत्सव शिगेला..!

भिगवण शहरामध्ये दहीहंडीचा उत्सव शिगेला..!

आधुनिक केसरी न्यूज

निलेश मोरे

भिगवण : दि.१७ भिगवण शहरात सर्वत्र दहीहंडी उत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. यंदा गोविंदा पथकांना आकर्षित करण्यासाठी नेते, पुढारी, सेलिब्रिटी, नृत्य तारांगणा, डीजे शो, लेझर लाईट शो, दहीहंडी उत्सवाचा थरार पहायला मिळणार आहे. दहीहंडी बघण्यासाठी येणाऱ्या तरुणांचा उत्सव शिगेला पोहोचला असून. भिगवण शहरामध्ये तुडुंब गर्दी होणार आहे. आयोजकांनी मोठ्या बक्षिसांची घोषणा केली आहे. त्यामुळे थर रचून दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळणार आहे.  भिगवण येथे १८ तारखेला ६ ठिकाणी दहीहंडीचे आयोजन एकाच दिवशी  होणार असून तर मदनवाडी येथे २१ तारखेला २ दहीहंडी उत्सवाचे आयोजन असणार आहे. तसेच तक्रारवाडी मध्ये दहीहंडी आयोजन करण्यात आले आहे.  भिगवणमध्ये विविध राजकीय पक्ष आणि संघटनांकडून दहीहंडी उत्सव आयोजित केले जातात. या उत्सवातील आयोजकांमध्ये आगामी  निवडणुकांच्या अनुषंगाने भर पडली आहे. दहीहंडीत नव्याने झालेले कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरणार आहे.

भिगवण मेन पेठे मध्ये  रोहित शेलार मित्रपरिवाराच्या वतीने राष्ट्रवादी चषक दहीहंडी चे आयोजन केले आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकात कॅबिनेट मंत्रीचषकाचे श्रीनाथ तरुण मंडळाने आयोजन केले आहे.  दुर्गा माता मंदिरामध्ये कृषिमंत्री चषक भिगवण युवा प्रतिष्ठान SSP ग्रुपच्या वतीने आयोजन केले आहे. तसेच मेन पेठ भोसले कॉम्प्लेक्स येथे आरोग्यदुत दत्तामामा भरणे चषक दुनियादारी ग्रुपने आयोजन केले आहे. तसेच सुप्रिया कॉर्नरला सिद्धार्थ ग्रुपने दहीहंडी उत्साहाचे आयोजन केले आहे. तसेच वार्ड क्रमांक ३ श्रीगणेश चौकात अनिकेत जमदाडे, करण थोरात, व जय श्रीराम ग्रुपने आयोजन केले आहे. तसेच मदनवाडी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात समृद्धी चषकचे आयोजन समृद्धी क्रीडा प्रतिष्ठान यांनी केले आहे.  पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चौकात जय हनुमान चषक चे आयोजन स्वप्निल बंडगर मित्रपरिवाराच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. आयोजकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

भिगवण शहरामध्ये दहीहंडीचा उत्सव शिगेला..! भिगवण शहरामध्ये दहीहंडीचा उत्सव शिगेला..!
आधुनिक केसरी न्यूज निलेश मोरे भिगवण : दि.१७ भिगवण शहरात सर्वत्र दहीहंडी उत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. यंदा गोविंदा पथकांना...
सततच्या पावसामुळे  मुंबई नागपूर महामार्गावरील कांचनगंगा नदीला पूर आल्याने 3 तास वाहतुक झाली ठप्प..!
स्कूल व्हॅन पुरात वाहून गेल्याने चालकाचा मृत्यू..!
कोठारी पुलालगत चा रस्ता खचला; प्रतीक केराम यांचे कंत्राटदारास रस्ता दुरुस्तीचे निर्देश
पावसाचा हाहाकार...! किनवट शहरासह परिसर ही जलमय  स्कूल बस गेली वाहून तर गोशाळेतील अनेक गाय वासरांचा मृत्यू
गणेश राठोड यांची एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी निवड..!
मी पैठणकर म्हणून सर्वांनी एकत्र यावे कुंभमेळ्याच्या बैठकीत आमदार भुमरे यांचे आवाहन