रक्त कर्करोगाशी झुंजणाऱ्या ९ वर्षांच्या छोट्या विहानला तुमची गरज आहे ; एका आईची आर्त हाक
आधुनिक केसरी न्यूज
सचिन सरतापे
म्हसवड सातारा : " एक हात मदतीचा " यां भावनेतून आयु.विहान गुरुदत्त शिंदे,९ वर्षांचा छोटा मुलगा गेल्या २ वर्षांपासून बी-सेल अॅक्युट लिम्फोब्लास्टिक ल्युकेमिया (रक्त कर्करोग) शी झुंज देत आहे. आता पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले आहे की स्टेम सेल प्रत्यारोपण हा त्याच्या जगण्याचा एकमेव पर्याय आहे - आणि तो तातडीने केला पाहिजे यासाठी आपल्यासारख्या दानशूर लोकांची गरज आहे अशी आर्त हाक आणि विनंती विहानची आई स्नेहल शिंदे यांनी केली आहे.
गेली दोन वर्षे छोटा विहान हा यां आजराशी झुंज देत आहे यासाठी त्याचे आई वडील स्नेहल शिंदे आणि गुरुनाथ शिंदे यांनी आपल्या जवळची जमा पुंजी खर्ची घातली आहे आज यां विहानच्या पुढील उपचारासाठी प्रत्यारोपण, शस्त्रक्रियेनंतरची काळजी, रुग्णालयात दाखल करणे आणि औषधांसाठी 5000000/- रुपयांची गरज असल्याचे रुग्णालंय प्रशासनाने सांगितले आहे
*आम्हाला ₹5000000/- ची आवश्यकता आहे. आम्ही सर्व बचत संपवली आहे, कर्ज घेतले आहे आणि आमच्या मुलाला वाचवण्यासाठी तुमच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे.
आशेने आणि कृतज्ञतेने, स्नेहल आणि गुरुनाथ शिंदे
छोट्या विहानला वाचवीण्यासाठी
https://www .impactguru.com/fundraiser/help-vihan-gurudatta-shinc यां मदत लिंक वर आपण आपली मदत सढळ हाताने करावे असे आवाहन छोट्या विहानचे आई वडील स्नेहल शिंदे आणि गुरुनाथ शिंदे यांनी केले आहे
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List