पिंपळगाव कुडा, लिंगा येथे महसूल विभागाची कारवाई : तीन ट्रॅक्टर जप्त अवैध रेती उत्खनन करणाऱ्यांमध्ये खळबळ!
आधुनिक केसरी न्यूज
बाळासाहेब भोसले.
सिदखेडराजा दि. 7 ऑगस्ट येथील पिंपळगाव कुडा व लिंगा(देवखेड) येथे सुरू असलेल्या अवैध रेती उत्खननावर महसूल प्रशासनाने आज मोठी कारवाई करत किन्हीसह तीन ट्रॅक्टर जप्त केले आहेत. ही कारवाई आज दिनांक ६ ऑगस्ट रोजी दुपारी अंदाजे २ वाजता करण्यात आली.दुपारी २ वाजेच्या सुमारास मौजे पिंपळगाव कुडा येथील खडकपूर्णा नदीपात्रातून किन्हीद्वारे अवैधरित्या रेती उत्खनन करून ट्रॅक्टर व टिप्परद्वारे वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती सिंदखेडराजा तहसील कार्यालयास प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारे तहसीलदार अजित दिवटे यांच्या नेतृत्वाखाली अवैध गौण खनिज वाहतूक पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत कारवाई केली. या कारवाईदरम्यान अतुल नागरे यांच्या मालकीचे फार्मट्रेक कंपनीचे निळ्या रंगाचे ट्रॅक्टर व लाल रंगाची ट्रॉली व अनंथा जाधव यांचे महिंद्रा कंपनीचे लाल रंगाचे ट्रॅक्टर व ट्रॉली तसेच महिंद्रा कंपनीचे लाल रंगाचे एक किन्ही जोडलेले ट्रॅक्टर रेती वाहतूक व उत्खनन करताना आढळून आले. या तीनही ट्रॅक्टर विना नंबर असल्याने राज्य परिवहन विभागाचे याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचे समजते. सदर तिन्ही वाहने ताब्यात घेण्यात आली असून, तहसीलदार दिवटे आणि नायब तहसीलदार प्रवीण वराडे यांनी स्वतः ट्रॅक्टर चालवत ती थेट पोलीस ठाण्यात नेली, ही बाब विशेष लक्षवेधी ठरली आहे. या धडक कारवाईत तहसीलदार अजित दिवटे, नायब तहसीलदार प्रवीण वराडे, मंडळ अधिकारी पी.पी. वानखेडे, पिंपळगाव कुडा ग्राम महसूल अधिकारी वसुदेव जायभाये, प्रदीप मोगल, सानप, एस.ए.निकम, पी.ए.झीने, साळवे, महसूल सेवक राजू खरात, मदन वायाळ, संतोष गायकवाड व इतर कर्मचारी सहभागी होते.
गेल्या काही दिवसांपासून पिंपळगाव कुडा परिसरात अवैधरित्या रेती उत्खनन आणि वाहतूक सुरू असल्याची माहिती नागरिकांतून मिळत होती. मुसळधार पावसातही ही वाहतूक सुरू असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी होती. मात्र महसूल विभागाने आज केलेल्या धडक कारवाईमुळे अवैध रेती तस्करांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महसूल विभागाच्या तत्परतेचे आणि धाडसी पावलामुळे सर्वत्र कौतुक होत आहे. तहसीलदार अजित दिवटे व नायब तहसीलदार डॉक्टर प्रवीण कुमार वराडे यांनी गुप्त माहिती द्वारे पिंपळगाव कुडा परिसरात खडकपूर्णा नदीपत्रालगत धडक मोहीम हाती घेतली यावेळी दोन्ही महसूलच्या अधिकाऱ्यांनी ट्रॅक्टरवर बसून पोलीस स्टेशनमध्ये ट्रॅक्टर जमा करण्याचे धाडस दाखवले.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List