गणेश राठोड यांची एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी निवड..!
आधुनिक केसरी न्यूज
घनसावंगी : मनाची तयारी असेल तर जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला हरवू शकत नाही हे दाखवून दिले आहे. शेवगळ येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतलेल्या गणेश राठोड यां मुलाने घरातून कोणत्याही प्रकारचा शैक्षणिक वारसा नसताना त्याने जिद्द आणि मेहनतीने NEET परीक्षेत ५०० गुन्हा सह उत्तीर्ण झाला आहे व त्याचा प्रवेश एमबीबीएस साठी प्रथम फेरी त अंबाजोगाई येथे झाला आहे. याचे औचित्य साधून जिल्हा परिषद शाळा शेवगळ तांडा येथील मुख्याध्यापक श्री शिवदास अमंडवाड यांनी गणेश राठोड यांचा सहकुटुंब सत्कार केला यावेळी अक्षय पवार, सुनंदा पवार, पंडित पवार, परमेश्वर राठोड, अमोल राठोड, विनोद शेषराव, चव्हाण, यांच्यासह ग्रामस्थांनी सुदाम राठोड यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कोणतेही यश संपादन करण्यासाठी मनात जिद्द जोश आणि चिकाटी पाहजे. मी कधीही घरच्या परिस्थितीचे भांडवल न करता स्वतःच्या हिमतीवर व स्वकर्तुत्वावर हे यश संपादित केलेले आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List