मी पैठणकर म्हणून सर्वांनी एकत्र यावे कुंभमेळ्याच्या बैठकीत आमदार भुमरे यांचे आवाहन
आधुनिक केसरी न्यूज
पैठण : दि,१६ नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर दक्षिण काशी गोदावरीच्या ठिकाणी श्रीक्षेत्र पैठणला ही कुंभमेळा भरतो.यात येणाऱ्या साधुसंतांना सोई सुविधा कशा प्रकारे देण्यात येतील याबाबत शनिवारी संत एकनाथ महाराज समाधी मंदिरात बैठक बोलवण्यात आलीहोती .या बैठकीत स्वच्छता विषयावर आनेकांनी सुचना मांडल्या याच मुद्यांवर आमदार विलासबाप्पु भुमरे यांनी मुख्याधिकारी यांना कडक शब्दात सुचना करत आदेश दिले.
या कुंभमेळ्याच्या दरम्यान पैठण करानी मी,माझे शहर हि भुमिका जपावी व यात सर्वांनी सहकार्याची भुमिका बाळगावी असे अवाहन केले.याप्रसंगी नाथ संस्थानचे विस्वस्त दादा बारे,दुध संघाचे उपाध्यक्ष नंदलाल काळे,नाथ वंशज योगीराज गोसावी,नाथ वंशज रघुनाथ म.पालखीवाले,कार्यकारी अभियंता राजेंद्र बोरकर,पोलीस निरीक्षक महादेव गोमारे,मुख्याधिकारी पल्लवी अंभोरे,शिवराज पारिक,सोमनाथ परदेशी,व्यापारी महासंघाचे अध्यक्ष स्वदेश पांडे,सचिव उमेश तट्टु,संजय पापडीवाल,माजी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष पवन लोहीया,बळीराम लोळगे,किशोर दसपुते,शहादेव लोहारे,यांची उपस्थिती होती.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List