पावसाचा हाहाकार...! किनवट शहरासह परिसर ही जलमय स्कूल बस गेली वाहून तर गोशाळेतील अनेक गाय वासरांचा मृत्यू
आधुनिक केसरी न्यूज
लक्ष्मीकांत मुंडे
किनवट : शनिवारी सकाळपासून जोरदार सुरुवात झाली असून दुपारी थोडी उसंत घेतली आहे. पुराच्या पाण्यामुळे नदी-नाले-ऐढ्याकाठची शेती आणि शेतातील पिकांसह जमिनी खरडून गेल्या. बोधडी बु.ते बोधडी खु., बोधडी ते सिंदगी मार्गावरील नाल्याच्या पुरात इंग्लीश स्कूलची विद्यार्थी वाहक बस पुराच्या पाण्यात वाहून चालक हा बेपत्ता झाला आहे. प्रधानसांगवी ते दूधगाव, कोठारी ते शनिवारपेठ अशा अनेक गावचा दुपारपर्यंत संपर्क तुटला आहे. इसापूर धरणाच्या पाण्यामुळे पैनगंगेच्या पुराच्या पाणीपातळीत अमर्याद वाढ झाल्याने किनवट, गोकुंदा बोधडी खुर्द अशा अनेक गावात पाणी शिरले असून, किनवट मधिल गोशाळेतील जवळपास पंचवीस दिव्यांग जनावरे वाहून गेली मृत्यूमुखी पडल्याचे प्रथमदर्शनी सूत्रांकडून समजते. किनवट आणि माहूर तालुक्यातील नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याच्या आमदार भीमराव केरामांनी प्रशासनाला सूचना दिल्या.
१६ आँगस्ट २०२५ च्या पहाटपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. तालुक्यातील सर्व नदी-नाले-ओढ्यांना महापूर येऊन शेतीत पाणी शिरले असून दाभाडी, प्रधानसांगवी, बोधडी अशा सर्वच गावातील शेती वाहिली, खरडून गेली, खरीपांची पीके बेपत्ता झाली. कांही घरांची पडझड झाली. रस्ते सुद्धा वाहून जनसंपर्क तुटला होता. उल्लेखनीय म्हणजे किनवट शहरातील गोशाळेत पेनगंगेच्या पुराचे पाणी शिरुन पंचवीस गाई आणि गोवंश मृत्यूमुखी पडल्याचे वृत्त आहे. प्रशासनाकडून मात्र कसलीही माहिती मिळू शकत नाही हे निष्क्रीय प्रशासनाचे अपयश आहे. गोशाळेतील मृत्यूमुखी पडलेल्या जनावरांची जबाबदारी कोणावर सोपवणार. प्रशासनाने जबाबदारी निश्चीत करुन दोषी विरुद्ध कारवाई करण्याची मागणी उपस्थितांमधून करण्यात आली.
गंगानगर, मोमीनपुरा, नाल्यागड्डा, आयप्पा काॅलनी, शिवमंदीर परिसर, साईबाबा मंदीर परिसर, रामनगर मामीडगुडा या भागातील लोकांना स्तलांतरीत करुन सोयीसुविधा पुरवल्याचे समजते. गोकुंदा येथिल वैशालीनगर, पेट्रोलपंप परिसरातील घरांमध्ये पाणी शिरले असून तेथिल लोकांना ग्रामपंचातीचे ग्रामपंचायत अधिकारी प्रविण रावळे यांनी लोकांना अभि.प्रशांत ठमके यांच्या वसतीगृहात स्थलांतरीत करुन सुविधा पुरवल्याचे सांगण्यात आले. गोकुंद्यात वहिवाटनाल्यावर अतिक्रमने करुन इमारती उभारल्यामुळे नाले अस्तित्वात नाहीत. परिनाम पूर्णपाणी रस्त्यावर येऊन खड्डेचखड्डे पडलीत. कोठारी ते शनिवारपेठ जाणार्या मार्गावरील कोठारी पुलाला लागून असलेल्या सोखींच्या शेतातील ले-आँऊट पूर्ण पंधरा फूट पाण्यात आहे. कोठारी ग्रामपंचायतीने ले-आऊटला मंजुरी दिली, त्या ठिकाणी वस्ती बसल्यास पूर्ण घरे वाहून जाऊन प्रचंड जीवितहानी होऊ शकते हे सूर्यप्रकाशाएवढे सत्य असतांना लाच घेऊन ग्रामपंचायत अधिकार्याने जाणीवपूर्वक मंजुरी दिल्या प्रकरणी कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी करण्यात आली आहे. मतदारसंघातील पूर्ण परिस्थितीचे तात्काळ पंचनामे करावीत. हयगय होणार नाही याची प्रशासनाने दक्षता घेण्याचे आवाहन करुन आमदार केरामांनी प्रशासनाला सूचना दिल्याचे वृत्त आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List