राधानगरी धरणाचे सातही दरवाजे खुले : भोगावती नदीला पूर

राधानगरी धरणाचे सातही दरवाजे खुले : भोगावती नदीला पूर

आधुनिक केसरी न्यूज

कुडूत्री : राधानगरी तालुक्यात गेले तीन ते चार दिवस मुसळधार पावसाने राधानगरी धरणाचे स्वयंचलित सातही दरवाजे उघडले आहेत.दरवाजे उघडण्याची ही दुसरी वेळ असून भोगावती नदीला दुसऱ्यांदा पूर आला असून नदीकाठची पिके पाण्याखाली गेली आहेत.असाच पाऊस सुरू राहिला तर  आणखीन पुराच्या पाण्यात वाढ होणार असून मोठया पुराची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नदीकाठच्या गावातील ग्रामस्थांनी दक्षता घ्यावी असे आवाहन जलसंपदा विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. गेल्या चार दिवसापासून राधानगरी तालुक्यात मुसळधार पावसाचे बॅटिंग सुरू आहे. त्यामुळे सात दरवाजे उघडले आहेत. या सात दरवाजातून १०००० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून पॉंवर हाऊस मधून १५०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे असा एकूण मिळून ११,५००  क्यूसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात चालू आहे. आज सकाळी सहा वाजल्यापासून १२५मिमी पावसाची नोंद झाली असून एकूण पाऊस ४१८८मि मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

राधानगरी धरणाचे सातही दरवाजे खुले : भोगावती नदीला पूर राधानगरी धरणाचे सातही दरवाजे खुले : भोगावती नदीला पूर
आधुनिक केसरी न्यूज कुडूत्री : राधानगरी तालुक्यात गेले तीन ते चार दिवस मुसळधार पावसाने राधानगरी धरणाचे स्वयंचलित सातही दरवाजे उघडले...
भिगवण शहरामध्ये दहीहंडीचा उत्सव शिगेला..!
सततच्या पावसामुळे  मुंबई नागपूर महामार्गावरील कांचनगंगा नदीला पूर आल्याने 3 तास वाहतुक झाली ठप्प..!
स्कूल व्हॅन पुरात वाहून गेल्याने चालकाचा मृत्यू..!
कोठारी पुलालगत चा रस्ता खचला; प्रतीक केराम यांचे कंत्राटदारास रस्ता दुरुस्तीचे निर्देश
पावसाचा हाहाकार...! किनवट शहरासह परिसर ही जलमय  स्कूल बस गेली वाहून तर गोशाळेतील अनेक गाय वासरांचा मृत्यू
गणेश राठोड यांची एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी निवड..!