पिरळसह पडळी पूल पाण्याखाली,वाहतूक बंद नदीकाठच्या भात, ऊस,केळी पिकात पाणी
आधुनिक केसरी न्यूज
कुडूत्री : राधानगरी तालुक्यात गेले तीन ते चार दिवस मुसळधार पावसाने राधानगरी धरणाचे स्वयंचलित सातही दरवाजे उघडल्याने पिरळ,पडळी पूल पाण्याखाली गेला असून या मार्गावरून होणारी वाहतूक बंद झाली आहे. शिवाय नदीकाठी भात, ऊस, केळी, आदी पिके पाण्याखाली गेली आहेत.पुराचा फटका पिकांना बसणार आहे.असाच पाऊस सुरू राहिला तर आणखीन पुराच्या पाण्यात वाढ होणार असून मोठया पुराची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नदीकाठच्या गावातील ग्रामस्थांनी दक्षता घ्यावी असे आवाहन जलसंपदा विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. गेल्या चार दिवसापासून राधानगरी तालुक्यात मुसळधार पावसाचे बॅटिंग सुरू आहे. त्यामुळे सात दरवाजे उघडले आहेत. या सात दरवाजातून १०००० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून पॉंवर हाऊस मधून १५०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे असा एकूण मिळून ११,५०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात चालू आहे. आज सकाळी सहा वाजल्यापासून १२५मिमी पावसाची नोंद झाली असून एकूण पाऊस ४१८८मि मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List