मेदनकल्लूर गावातील ८ नागरिकांना पुराच्या पाण्यातून एसडीआरएफ टीमच्या मदतीने काढले सुखरुप बाहेर

मेदनकल्लूर गावातील ८ नागरिकांना पुराच्या पाण्यातून एसडीआरएफ टीमच्या मदतीने काढले सुखरुप बाहेर

आधुनिक केसरी न्यूज

नांदेड : देगलूर तालुक्यामधील मेदनकाल्लूर या गावांमध्ये आठ लोक पुराच्या पाण्यामुळे अडकलेले होते. दिनांक 27 ऑगस्टपासून निजामसागर धरणाचा विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढवल्यामुळे त्याचा फटका देगलूर तालुक्यामधील तमलूर, मेदनकल्लूर, उमर सांगवी या गावांना बसला. त्या अनुषंगाने प्रशासनामार्फत 27 ऑगस्ट रोजी प्रत्येक गावी भेट देऊन नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर होण्याचे आवाहन करण्यात आले होते. 

मेदनकाल्लूर गावांमधील आठ व्यक्तींना प्रशासनामार्फत वेळोवेळी संपर्क साधून सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी आवाहन केले होते. तरी देखील संबंधित व्यक्ती  गावामधून बाहेर पडले नाहीत. 28 ऑगस्ट रोजी प्रशासनामार्फत संबंधित व्यक्तींना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी गेले असता संबंधित व्यक्ती पळून जाऊन गावामध्ये लपून बसले. परंतु पाण्याचा प्रवाह वाढतच राहिल्याने प्रशासनाने काल 29 ऑगस्ट 2025 रोजी एसडीआरएफ टीमच्या मदतीने संबंधित  1)सिद्धी आनवर देसाई.2)सिद्धी आसलम देसाई3) सिद्धी मुक्रम देसाई4)सिद्धी शाकीर सिद्धी मूनतान  देसाई 5)पाशा देसाई 6)सिद्धी शरीफ देसाई 7)बागवानिन अमीन खान 8)मुमताज अमुजामी यांना सायंकाळी सहाच्या सुमारास सुरक्षित रित्या बाहेर काढले. यावेळी प्रशासनामार्फत उपविभागीय अधिकारी देगलूर अनुप पाटील तहसीलदार देगलूर भरत सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक मारुती मुंडे स्थानिक प्रशासन आणि संबंधित ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

मराठा आरक्षणासावर मंत्री चंद्रकांत पाटील यांची खडसावून टीका अन् म्हणाले..! मराठा आरक्षणासावर मंत्री चंद्रकांत पाटील यांची खडसावून टीका अन् म्हणाले..!
आधुनिक केसरी न्यूज ममुंबई : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे मराठा बांधवांसह मुंबईमध्ये आझाद मैदानावर आंदोलन सुरु आहे. जरांगे...
हॉटेल मटण भाकरीच्या नावाखाली सुरू होता वेगळाच कार्यक्रम 
मेदनकल्लूर गावातील ८ नागरिकांना पुराच्या पाण्यातून एसडीआरएफ टीमच्या मदतीने काढले सुखरुप बाहेर
मराठा समाजासाठी गठीत वंशावळ समितीस 30 जून 2026 पर्यंत मुदतवाढ
पैठण तालुक्यातील गावागावातुन मुंबई ला आंदोलकांनासाठी चटणी - भाकरी- लोणचं
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा : पालकमंत्री अतुल सावे
मराठा आरक्षण देण्यास राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, फडणवीस जी; ७ दिवसात आरक्षण देण्याचे काय झाले? : हर्षवर्धन सपकाळ