हॉटेल मटण भाकरीच्या नावाखाली सुरू होता वेगळाच कार्यक्रम
पोलिसांनी धाड टाकताच मिळाले अडीच कोटी रुपये : सोलापुरात उडाली मोठी खळबळ
आधुनिक केसरी न्यूज
महेश गायकवाड
सोलापूर : हॉटेल मटण भाकरीच्या नावाखाली आत मध्ये मात्र वेगळाच कार्यक्रम सुरू होता. या कार्यक्रमाची टीप पोलिसांना मिळाली यानंतर सदर हॉटेल वर सांगोला पोलिसांनी धाड टाकली असता खळबळजनक परिस्थिती तिथे दिसून आली हॉटेल मटण भाकरी मध्ये चक्क जुगार धंदा सुरू होता यात 52पत्त्यांचा डाव खेळला जात होता या वेळी पोलिसांनी मोठी कारवाई करता रोख
अडीच कोटी रुपये हस्तगत केले आहेत यामुळे सोलापूर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
हॉटेल मटण भाकरी मध्ये सांगोला पोलिसांनी धाड टाकताच तिथे गंभीर चित्र दिसले जवळपास लग्न कार्यात लोक येतात तशी मंडळी येथे जमले होते आणि ते सर्वजण 52पत्त्यांचा डाव खेळत होते.
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यामधील सोनंद या गावात हा प्रकार घडला आहे. सोनंद या गावात हॉटेल मटन भाकरीच्या आड जुगार चालत असलेल्या हॉटेलवर पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये 52 पत्त्यांचा डाव खेळत असताना 50 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे
यामध्ये आत्तापर्यंत सर्वात मोठी रक्कम जवळपास 2 कोटी 68 लाख 72 हजार 150 रुपये मुद्देमाल जप्त केला आहे. सोलापूर जिल्ह्यातील ही सर्वात मोठी कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी केलीय.
याबाबत सांगोला तालुक्यातील सोनंद याठिकाणी हॉटेल मटन भाकरीच्या सिमेंट पत्र्याच्या खोलीत असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली. विनापरवाना जुगार क्लब चालवणारे सचिन साहेबराव काशीद (रा. सोनंद, ता. सांगोला) आणि शंभुलिंग प्रकाश तेरदाळ (रा. आथणी जि. बेळगाव) जुगार क्लब चालवत असताना त्यांच्यावर छापा टाकून पोलिसांनी कारवाई केली केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी रक्कम जुगार अड्ड्यावर मिळाली असून ती पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. त्याचबरोबर 50 जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
यामध्ये रोख रक्कम 16 लाख 9 हजार 62 रोख रक्कम, 62 मोबाईल, 26 चारचाकी वाहन, 61 दुचाकी वाहने आणि देशी विदेशी दारू असा एकूण 2 कोटी 68 लाख 72 हजार रुपये मुद्देमालासह हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत सांगोला पोलीस ठाण्यामध्ये तब्बल 50 जणांवर महाराष्ट्र जुगार कायदा अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे, त्याचबरोबर पोलीस कर्मचारी भारत भोसले, अनिल पाटील, दत्तात्रय तोंडले, निलेश डोंगरे, मंगेश रोकडे, संतोष गायकवाड, शितल चव्हाण, राहुल लोंढे, निलेश रोंगे यांनी ही कामगिरी पार पाडली.
सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे सुरू असून या कडे पोलिस अधीक्षक यांचे दुर्लक्ष झाले आहे
ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर जुगार हातभट्टी दारू क्लब सुरू आहेत फायनान्स च्या नावाखाली व्याज बट्टी चे धंदे सर्वत्र सुरू आहेत सोलापूर जिल्ह्यातील सर्व ठिकाणी अवैध धंद्याचा सुळसुळाट वाढला आहे अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे याकडे पोलिस खाते पध्दतशीर दुर्लक्ष करत आहे. अशी भावना नागरिकांनी प्रस्तुत प्रतिनिधी शी बोलून दाखवली.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List