विद्युत लाईनचा शॉट लागल्याने महिलेचा मृत्यू..!
आधुनिक केसरी न्यूज
सिदखेडराजा : तालुक्यातील जऊळका येथे आज दि. 28 ऑगस्ट रोजी दुपारी शेतात काम करत असताना विद्युत शॉक लागून एका महिलेचा जागीच मृत्यू झाला.मृत महिलेचे नाव मंगलबाई रंगनाथ सांगळे (वय 57 वर्षे, रा. जऊळका, ता. दुसरबीड) असे असून, सकाळी सुमारे 10 वाजता त्या आपल्या पती रंगनाथ सांगळे यांच्यासह शेतातील सोयाबीन निंदण्यासाठी गेल्या होत्या.शेतामध्ये विद्युत खांब उभारलेला असून त्याला जोडलेला तानाचा वायर पावसामुळे झालेल्या ओलसर जमिनीतून विद्युत प्रवाह घेऊन धोकादायक ठरला होता.
सोयाबीन निंदणी करताना मंगलबाई यांचा हात त्या तानाला लागला आणि विजेचा जबर धक्का बसल्याने दुपारी 4 वाजताच्या सुमारास त्यांचा जागीच मृत्यू झाला.दरम्यान, कालच पाऊस झाल्याने शेत ओलसर होते. त्यामुळे विजेच्या शॉर्टमुळे महिलेचा हात तानाला चिकटला आणि तात्काळ मृत्यू ओढवला.घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी धाव घेऊन पोलिसांना कळवले. बातमी लिहीपर्यंत सदर प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List