श्रींच्या ११५ व्या पुण्यतिथी, उत्सवाची सांगता हजारों भाविकांनी घेतला श्रींचे दर्शन
आधुनिक केसरी न्यूज
दिपक सुरोसे
शेगांव : दि. २८ श्री गजानन महाराज संस्थान, शेगांव (पब्लिक ट्रस्ट रजि. नं. ए-२५० बुल) श्री संस्थानव्दारे ११५ वा श्री पुण्यतिथी उत्सव दि. २४/०८/२०२५ ते दि. २८/०८/२०२५ पर्यंत धार्मिक प्रथा-परंपरेनुसार संपन्न झाला. या उत्सवात दरारोज सकाळी ६.०० ते ६.४५ काकडा, ७.१५ ते ९.१५ गाथा भजन, दुपारी ४ ते ५ प्रवचन, सायंकाळी ५.३० ते ६ हरिपाठ व रात्री ८ ते १० श्रीहरी कीर्तन संपन्न झाले. सप्ताहात श्री ह.भ.प. सुरेश बुवा वाकडे, पुसद, श्री ह.भ.प. भरत बुवा जोगी, परळी, श्री ह.भ.प. प्रशांत बुवा ताकोते, सिरसोली, श्री ह.भ.प. भरत बुवा पाटील, म्हैसवाडी, श्री ह.भ.प. बाळु बुवा गिरगांवकर, गिरगांव आदी कीर्तनकारांचे कीर्तन संपन्न झाले.
श्री गणेशयाग व वरूणयागास भाद्रपद शु. १ ला प्रारंभ होवून भाद्रपद शु. ५ ला सकाळी १० वाजता यागाची पुर्णाहूती झाली. तसेच श्रींचे समाधि सोहळ्या निमित्य श्रीहरी कीर्तन होवून कार्यक्रम संपन्न झाला. यावर्षी श्री पुण्यतिथी उत्सवांत श्रींचे सेवेत ४६२ दिंड्यांनी सहभाग घेतला. यापैकी नियमांची पूर्तता केलेल्या एकूण ७३ नविन दिंड्यांना १० टाळ, १ विणा, १ मृदंग, श्री ज्ञानेश्वरी, श्री तुकाराम गाथा, श्री एकनाथी भागवत असे संत वाङ्मय आणि श्री माऊली पताक वितरीत करण्यात आल्या. जुन्या दिंड्यांना भजनी साहित्य दुरूस्तीकरीता नियमाप्रमाणे सानुग्रह अंशदान व इतर व्यवस्थेकरीता सहयोग देण्यात आला. तसेच उत्सवानिमित्य आलेल्या भजनी दिंड्यांमधील वारकऱ्यांची भोजनप्रसादाची व्यवस्था तसेच प्रथमोपचार केंद्राची सुविधा विसावा संकूल येथे करण्यात आली. तसेच उत्सव काळात श्री शेगांवसह श्री शाखा पंढरपूर, आळंदी, त्र्यंबकेश्वर, पंपासरोवर, ओंकारेश्वर, गिरडा अशा सर्व शाखांवर श्रींचा समाधि उत्सव संपन्न होऊन १,१८,००० चे वर भक्तांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. अशारितीने श्रीकृपेने वारकऱ्यांची व भाविकांची सेवा घडून आली आहे, असे श्री संस्थान तर्फे कळविण्यात आले.
धन्य आज दिन संत दर्शनाचा. श्री संत गजानन महाराजांचा ११५ वा पुण्यतिथी उत्सव निमित्ताने श्रींचे संस्थानच्या वतीने दि. २७, २८ ऑगस्ट २०२५ असे दोन दिवस श्रींचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवण्यात आले यामुळे श्रींच्या समाधी दर्शनासाठी गुरुवार रोजी ३ तास तर श्रीमुख दर्शनासाठी २० मिनिटे वेळ लागत आहे.
श्रींच्या पालखीचे परिक्रमा.
दुपारी ४ वाजता श्रींच्या मंदिरातून श्रींच्या पालखीचे विधिवत पुजा करुन श्रींच्या पालखीचे अश्व, पताकाधारी, टाळकरी, वारकरी, रथ, मेणा, व भजनी दिंडीच्या सहभागाने ज्ञानोबा तुकाराम, श्री गजानन जय गजानन, धन्य आज दिन संत दर्शनाचा अशा विविध भजनांनी वातावरण भक्तीमय झाले परिक्रमा निघुन सायंकाळी श्री संत गजानन महाराज मंदिरात आरती करण्यात आली. श्रींच्या पालखीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती तर पालखीच्या मार्गावर विविध प्रकारच्या आकर्षक रांगोळी काढण्यात आले.
श्रींच्या दर्शनासाठी बुधवार, गुरुवार या दोन दिवसांत एक लाखाहून अधिक भाविकांनी श्रींच्या समाधी, व श्रीमुख दर्शन घेतले आहे.
शुक्रवार रोजी काल्याचे कीर्तन...
दि.२९ ऑगस्ट रोजी ह.भ.प. प्रमोद बुवा राहाणे
यांचे सकाळी ६ ते ७ काल्याचे कीर्तन होईल व नंतर दहीहंडी गोपाळकाला कार्यक्रमाने या उत्सवाचे सांगता होणार आहे
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List