तारळेतील दहीहंडीत गांगोमाऊली संघ विजेता तुफान गर्दीच्या साक्षीने साकारला दहीहंडी उत्सव
आधुनिक केसरी न्यूज
सुभाष चौगले
कुडूत्री : उपस्थित तरुणाईचा जल्लोष,तालुक्यातून आलेले मोठ्या संख्येने दहीहंडी शौकीन व्यासपीठावर मान्यवरांची मांदियाळी,राज अन सरकार अश्वाचा नजराणा, यामुळे क!! तारळे तालुका राधानगरी येथील स्वराज्य ग्रुप चे संस्थापक शेखर पाटील (भैय्या) आयोजित अविस्मरणीय दहीहंडीच्या थरारात अखेर गांगोमाऊली संघाने (सिंधुदुर्ग) येथील गोविंदानी बाजी मारली.विजेत्या संघाला दीड लाख रुपये व ट्रॉफी पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
शेखर पाटील भैय्या यांच्या वतीने राधानगरी तालुक्यात दिड लाख रकमेचे प्रथमच एवढ्या मोठ्या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचा शुभारंभ शिवसेना उपनेते शिंदे गट निलेश सांबरे यांच्या हस्ते करून दहीहंडीला सुरुवात करण्यात आली. सर्व सोयी आणि सुविधा उपलब्ध करत नेटके नियोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात विविध निवड झालेल्या व गुणवंताचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास शिवसेना उपनेते(शिंदे गट) निलेश सांबरे, संतोष ठाकरे, विजय बाबा महाडिक, गोल्डनमॅन सागर पाटील,अभिजित तापेकर, भोगावती संचालक रवींद्र पाटील, मानसिंग पाटील, भो.माजी चेअरमन संजय सिंह पाटील, दत्तात्रय हणमा पाटील, शौकत बक्षु,भो.माजी संचालक शिवाजी पाटील ,कोजिमाशी संचालक जयसिंग पवार, माजी सरपंच मारुती पोवार,शेखर भैय्या प्रेमी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार मधुकर किरुळकर,सुरेश पाटील यांनी केले. आभार शेखर पाटील यांनी मानले.
जवान सातारा मिसाळ यांना श्रद्धांजली अर्पण
मिसाळवाडी तालुका राधानगरी येथील जवान साताप्पा मिसाळ यांना उपस्थित जनसमुदायाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यामुळे त्यांच्या आठवणींना उजाळा मिळाला.
अभिनेत्रींची उपस्थिती
दही हंडी कार्यक्रमासठी अभिनेत्रींची उपस्थिती लक्षवेधक ठरली.त्यामध्ये पूजा जोस्वाल,स्वप्नाली रजपूत, राजश्री पुणेकर यांचा सहभाग होता.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List