एसटी कर्मचाऱ्यांना ऑगस्ट मधील वेतन गणेशोत्सवापूर्वी मिळणार ; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
आधुनिक केसरी न्यूज
रत्नपाल जाधव
मुंबई : २५ ऑगस्ट गणपती सणात अहोरात्र झटणाऱ्या एसटीच्या सुमारे ८३ हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांचे ऑगस्ट महिन्याचे वेतन गणपती उत्सवापूर्वी देणार असल्याचा निर्णय झाल्याचे परिवहन मंत्री तथा एस. टी. महामंडळाचे अध्यक्ष श्री. प्रताप सरनाईक यांनी दिली.एसटीच्या कर्मचाऱ्यांचा पगार महिन्याच्या ७ तै १०या तारखेच्या दरम्यान होत असतो. यंदा गणपती उत्सव हा ऑगस्ट महिन्याच्या शेवटी आल्याने कर्मचाऱ्यांना गणपती उत्सवा अगोदर पगार देण्याचे ठरले आहे. राज्य सरकारला एसटीच्या विविध सवलती पोटी ची प्रतिपुर्ती रक्कम लवकर देण्याची विनंती आपण केल्याची मंत्री सरनाईक यांनी सांगितले. त्यानुसार २५ ऑगस्ट रोजी या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून, लवकरच एसटीच्या सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या बॅक खात्यांवर त्यांचे ऑगस्ट महिन्याचे वेतन जमा होईल!
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List