ट्रॅक्टर चोरीचा गुन्हा अवघ्या 5 तासात उघडकीस ; सपोनि अक्षय सोनवणे आणि स्टाफची धडाकेबाज कामगिरी
आधुनिक केसरी न्यूज
सचिन सरतापे
म्हसवड (सातारा ) : अनिल विष्णू माने राहणार हिंगणी, तालुका माण, जिल्हा सातारा यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली की त्यांचा स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर क्रमांक एम एच 11 सी डब्ल्यू 3985 हा त्यांच्या राहत्या घराजवळून कोणीतरी अज्ञात आरोपीने त्यांच्या संमतीशिवाय लबाडीने चोरून घेऊन गेले होते. या अनुषंगाने यातील तक्रारदार यांनी बराच शोध घेतल्यानंतर सुद्धा ट्रॅक्टर न सापडल्यामुळे ट्रॅक्टरचोरी वाहन चोरीचा गुन्हा म्हसवड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी तपासाची चक्रे फिरवली आणि तपासाच्या अनुषंगाने अधिक माहिती घेतली असता तसेच गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदर गुन्हा हा आरोपी नामे धनाजी पुनाजी लोखंडे, राहणार दिवड, तालुका माण, जिल्हा सातारा यांनी केल्याचे निष्पन्न करून सदर आरोपीला पकडण्याकरिता तात्काळ टीम रवाना करून या आरोपीस अवघ्या 5 तासात ताब्यात घेतले असता व चोरलेल्या ट्रॅक्टर बाबत विचारणा केली असता त्यांनी अगोदर उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याचबरोबर त्याच्या राहत्या घराच्या परिसरात सदरचा ट्रॅक्टर न दिसून आल्यामुळे त्याला याबाबत विचारणा केली व पोलिसी खाक्या दाखवताच त्याने चोरलेला ट्रॅक्टर गोंदवले बुद्रुक येथील चिक्कूच्या बागेत लपवून ठेवल्याचे सांगितल्यामुळे पुन्हा पथक गोंदवले या ठिकाणी रवाना करून सदर ट्रॅक्टरचा शोध घेतला असता हा चोरलेला ट्रॅक्टर आरोपी नामे याने गोंदवले येथील शेतामध्ये लपवून ठेवलेला होता. तो ट्रॅक्टर तात्काळ ताब्यात घेऊन व आरोपीस ताब्यात घेऊन पुढील कारवाई करिता आरोपीस म्हसवड पोलीस ठाण्यात आणून त्यास या गुन्ह्याच्या अनुषंगाने पुढील अटकेची कार्यवाही करण्यात आली आहे. सदरचा गुन्हा अवघ्या 5 तासात उघडकीस आणून चोरलेला 8 लाख 50 हजार रुपये किमतीचा ट्रॅक्टर आणि आरोपी ताब्यात घेतल्यामुळे तक्रारदार आणि नागरिकांनी चोरीच्या घटनेचा जलद तपास झाल्याबद्दल म्हसवड पोलिसांचे अभिनंदन केले आहे. सदरची कामगिरी ही सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री तुषार दोशी सर, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत सर यांच्या मार्गदर्शनाखाली खालील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केलेली आहे.सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, शहाजी वाघमारे, अमर नारनवर, मैना हांगे, वसीम मुलानी, विकास ओंबासे, संतोष काळे
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List