अंजनी येथे शक्तिपीठ महामार्गाची मोजणी रोखली शेतकऱ्यांचा विरोध बघून मोजणी अधिकाऱ्यांचा गावातून काढता पाय..!

अंजनी येथे शक्तिपीठ महामार्गाची मोजणी रोखली शेतकऱ्यांचा विरोध बघून मोजणी अधिकाऱ्यांचा गावातून काढता पाय..!

आधुनिक केसरी न्यूज

सचिन सरतापे 

म्हसवड : शक्तीपीठ महामार्ग रद्दच झाला पाहिजे या मागणीसाठी गेली दीड वर्षापासून शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्ग बाधीत शेतकरी संघर्ष समितीचे बॅनर खाली १२ जिल्ह्यातील बाधीत शेतकऱ्यांना एकजूट करून लढा उभा केला आहे. सांगली जिल्ह्यातील शक्तिपीठ महामार्ग बाधीत शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी देण्यास तीव्र विरोध केला आहे.. तासगांव कवठे महांकाळ मिरज तालुक्यातील अनेक बाधीत गावातील शेतकऱ्यांनी एकजुटीने १००% नकार दिला आहे.. मोजणी अधिकाऱ्यांना वावरात पाय ठेवू दिला नाही.. आज अंजनी गावात शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणी साठी अधिकारी आले असता त्यांना गावातील चौकात अडवून  तिसंगी, डोंगरसोनी , सावळज , कवलापूर, मणेराजुरी, व इतर गावात मोजणी अधिकारी यांनी गावातील चावडीत बसून सर्व बाधीत शेतकऱ्यांनी दिलेला नकार लिखित स्वरूपात पंचनामा करून शासनास कळविले आहे..आज अंजनी येथील सर्व बाधीत शेतकऱ्यांनी सर्व शेतकऱ्यांचा  आमच्या सर्व शेतकऱ्यांचा विरोध आहे लिखित पंचनामा करून आमचा नकार शासनास कळवावा  अशी विनंती केली असता  मोजणी साठी आलेल्या अधिकाऱ्यांनी आडमुठी भूमिका घेऊन ..आम्ही पंचनामा करणार नाही..असे सांगितले सर्व शेतकऱ्यांनी ठणकावून सांगितले..उद्या पासून शक्तिपीठ महामार्ग मोजणी साठी आमच्या अंजनी गावात अजिबात फिरकायचे नाही.. परत याल तर शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधाला सामोरे जावे लागेल.. शेतकऱ्यांच्या संताप लक्षात घेऊन अधिकाऱ्यांनी गावातून काढता पाय घेतला..
 यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई दिगंबर कांबळे संघर्ष समितीचे राज्य संपर्क प्रमुख शरद पवार गव्हाण, संघर्ष समितीचे प्रवक्ते  दत्तात्रय पाटील, विकास पाटील, आनंदा मंडले, धनाजी पाटील, बाळासो पाटील, जगन्नाथ पाटील, रफिक मुलाणी, आदम मुलाणी, झाकीर मुलाणी,संजय पाटील, नामदेव निंबाळकर, मानसिंग निंबाळकर, मिरासो मुलाणी, दिनकर पाटील, बाळासो वाघमारे, सुभाष जमदाडे, बाळासाहेब लांडगे व इतर बाधीत शेतकरी उपस्थित होते.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

एसटी कर्मचाऱ्यांना ऑगस्ट मधील  वेतन गणेशोत्सवापूर्वी  मिळणार ; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती  एसटी कर्मचाऱ्यांना ऑगस्ट मधील  वेतन गणेशोत्सवापूर्वी  मिळणार ; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती 
आधुनिक केसरी न्यूज रत्नपाल जाधव  मुंबई : २५ ऑगस्ट  गणपती सणात अहोरात्र झटणाऱ्या  एसटीच्या सुमारे ८३ हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांचे...
नुकसानग्रस्तांच्या सर्व समस्या प्राधान्याने सोडवू : पालकमंत्री अतुल सावे
तारळेतील दहीहंडीत गांगोमाऊली संघ विजेता तुफान गर्दीच्या साक्षीने साकारला दहीहंडी उत्सव
छत्रपती संभाजीनगर येथील शेंद्रा-बिडकीन औद्योगिक क्षेत्र (ऑरिक) मध्ये नवीन भूखंड वाटपास मंजूरी
शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांना उच्च न्यायालयाचा दिलासा निषेधाचे पत्र ही ‘बदनामी’ नव्हे !
अंजनी येथे शक्तिपीठ महामार्गाची मोजणी रोखली शेतकऱ्यांचा विरोध बघून मोजणी अधिकाऱ्यांचा गावातून काढता पाय..!
ट्रॅक्टर चोरीचा गुन्हा अवघ्या 5 तासात उघडकीस ; सपोनि अक्षय सोनवणे आणि स्टाफची धडाकेबाज कामगिरी