आज श्रींच्या पुण्यतिथीनिमित्त भाविकांची मांदियाळी किर्तन, यागाची पुर्णाहूती, श्रींचा पालखी सोहळा

आज श्रींच्या पुण्यतिथीनिमित्त भाविकांची मांदियाळी किर्तन, यागाची पुर्णाहूती, श्रींचा पालखी सोहळा

आधुनिक केसरी न्यूज

दिपक सुरोसे

शेगांव : दि.२७ आज श्रींचा पुण्यतिथी उत्सव सोहळा दि. २८ ऑगस्ट  गुरुवार रोजी भक्तिमय वातावरणात साजरा होत आहे. या सोहळ्यासाठी संतनगरी सज्ज झाली आहे.  राज्याच्या कानाकोपऱ्यातून जवळपास ४५० च्यावर भजनी दिंड्या आज सायंकाळपर्यंत संत नगरीत दाखल झाल्या होत्या व भजनी दिंड्या येण्यांचा ओग संत नगरीत चालू आहे. श्री संत गजानन महाराज संस्थानच्या वतीने श्री संत गजानन महाराजांचा ११५ वा पुण्यतिथी उत्सव दिनांक २४ ऑगस्ट  ते २९ ऑगस्ट या कालावधीत भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज श्रींच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त श्रींच्या पुण्यतिथी दिनी २८ ऑगस्ट वार गुरुवार मिती भाद्रपद शुक्ल ५ सकाळी ७ ते ९  श्रींचे समाधी सोहळ्यानिमित्त ह भ प भरत बुवा पाटील यांचे कीर्तन होईल. सकाळी १० वाजता श्री गणेशयाग व वरूणयागास ब्रह्मवृंदांच्या मंत्रोपचारात  दिनांक २८ ऑगस्ट श्रींच्या पुण्यतिथी दिनी सकाळी १० वाजता श्री गणेश याग,व वरून यागाची पुर्णाहूती व अवभृतस्नान होईल.
श्रींच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त श्रींची पालखी दुपारी नगरपरिक्रमेसाठी निघेल.
## श्रींच्या पालखीचा परिक्रमा मार्ग :-
श्री पुण्यतिथी उत्सवानिमित्य दि.२८ ऑगस्ट रोजी श्रींच्या पालखीचे  परिक्रमा  भजनी दिंडीसह दुपारी ४.०० वाजता श्री मंदिर परिसरातून निघेल. श्री पालखी परिक्रमा मंदिर परिसरातील उत्तर द्वारातून, महात्मा फुले बँके समोरुन, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीराव फुले चौकातून, श्री संत सावता माळी चौक, श्री हरिहर मंदिर जवळून, भिम नगर (तिन पुतळा परिसर), शाळा नं. २ (सावित्रीबाई फुले चौक), फुले नगरातून, श्री प्रगटस्थळ जवळून, सितामाता मंदिर, लायब्ररी जवळून (श्री गर्गाचार्य मंदिरा समोरुन), पश्चिम गेटमधून श्री मंदिर परिसरामध्ये सायं. ६.३० वाजताचे आसपास परत येईल.
 
श्रींच्या पालखीचे आगमन होईल.
श्रींच्या मंदिर परिसरात व श्रींच्या समाधी मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर संपूर्ण मंदिर परिसरात केळीचे खांब व आंब्याच्या पानाचे तोरण लावण्यात आले आहेत व सर्वत्र मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे.

*भजनी दिंड्यांचे संतनगरीत आगमन*
जय गजानन श्री गजानन, ज्ञानोबा तुकाराम,
नाम विठोबाचे घ्यावे पुढे पाऊल टाकावे, गण गण गणात बोते मंत्राचा नाम जप करत जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल असा श्रींच्या नामाचा गजर करत असंख्य भजनी दिंड्या संतनगरीत दाखल होऊन श्रींच्या मंदिर परिसरात जाऊन श्रींचे समाधीचे व कळसाचे दर्शन करून नित्य मार्गाने जात आहेत.

** श्रींच्या मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई
     श्रींच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त श्रींच्या मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सर्वत्र मंदिर परिसरात केळीचे खांब व आंब्याच्या पानाचे तोरण लावण्यात येऊन भक्तीमय वातावरण असून श्रींच्या नाम गजरात  फक्त तल्लीन होत श्रींच्या पुण्यतिथी उत्सवात सहभागी होत आहे.

गुरुवार रोजी ही श्रींचे मंदिर रात्रभर खुले 
राज्यासह, इतर राज्यातील हजारो भक्त श्रींच्या दर्शनासाठी शेगांव येथे दाखल होत आहे. भक्तांना लवकरात दर्शन घेता यावे, श्री संत गजानन महाराज संस्थानच्या वतीने बुधवार, गुरुवार असे दोन दिवस श्रीचे मंदिर दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले आहे.

हजारों भाविकांनी घेतला महाप्रसाद....
श्री गजानन सेवा समिती व्दारा श्रींच्या ऋषिपंचमी उत्सवानिमित्त महाप्रसादाचे आयोजन अग्रसेन भवन येथे  दि.२७ व २८ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजेपासून रात्रीपर्यंत अविरत महाप्रसाद लाभ हजारो भाविकांनी घेतला. शेगाव, नागपूर, अकोट, भक्त परिवार श्री गजानन सेवा समितीव्दारे दरवर्षी ऋषिपंचमी, रामनवमी, प्रगटदिन या उत्सव काळात श्रींच्या भक्तांना महाप्रसादाचे वितरण करून आपली सेवा श्रींच्या चरणी अर्पीत करीत आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

मराठा आरक्षण देण्यास राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, फडणवीस जी; ७ दिवसात आरक्षण देण्याचे काय झाले? : हर्षवर्धन सपकाळ मराठा आरक्षण देण्यास राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, फडणवीस जी; ७ दिवसात आरक्षण देण्याचे काय झाले? : हर्षवर्धन सपकाळ
आधुनिक केसरी न्यूज मुंबई, : दि. २९ ऑगस्ट २०२५ मराठा आरक्षण देण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती लागते आणि तीच भाजपा व देवेंद्र...
माजी सभापती बालाजीराव पांडागळे यांना मातृशोक
विद्युत लाईनचा शॉट लागल्याने महिलेचा मृत्यू..!
नायगाव तालुक्यात दोन ठिकाणी पुराच्या पाण्यातून ; नागरिकांसह विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे काढले बाहेर
श्रींच्या ११५ व्या पुण्यतिथी, उत्सवाची सांगता हजारों भाविकांनी घेतला श्रींचे दर्शन
आज श्रींच्या पुण्यतिथीनिमित्त भाविकांची मांदियाळी किर्तन, यागाची पुर्णाहूती, श्रींचा पालखी सोहळा
घरकुलाचा दुसरा हप्ता काढण्यासाठी लाच घेताना कंत्राटी गृहनिर्माण अभियंता रंगेहाथ पकडला