कोयना धरनातून 95300 क्युसेकचा पाण्याचा विसर्ग जिल्हाधिकारी संतोष पाटील व पाटणचे तहसीलदार अनंत गुरव स्थलांतरित कुटुंबाना दिलासा

कोयना धरनातून 95300 क्युसेकचा पाण्याचा विसर्ग जिल्हाधिकारी संतोष पाटील व पाटणचे तहसीलदार अनंत गुरव स्थलांतरित कुटुंबाना दिलासा

आधुनिक केसरी न्यूज

 नितीन राजे

खटाव : संपूर्ण महाराष्ट्राला वीज पुरवठा करणारे सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील कोयना  धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस वाढल्यामुळे धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी   कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे 12 फुटांवरून 13 फुटापर्यंत उघडून 95,300 क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात आले आहे. नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला असून काही कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले आहे.कोयना धरणाची  एकूण क्षमता 105.25 टीएमसी  असून आज 20 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वा. पर्यंत 101.47 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे . कोयना धरण 93.66 टक्के भरले आहे. आत्तापर्यंत 102 टीएमसी पाणीसाठा धरणात साठवला जातो. सातारा जिल्ह्यात पावसाचा वाढता जोर असून धरण पाणलोट क्षेत्रात  ज्या ठिकाणी कुटुंबे स्थलांतरित करण्यात आलेली आहेत त्यांची आज जिल्हाधिकारी संतोष पाटील व पाठाचे तहसीलदार अनंत गुरव यांनी  कै. ज्ञानोजीराव साळुंखे हायस्कूल पाटण येथे स्थलांतरित कुटुंबांना भेट  घेऊन त्यांच्या अडचणी समजून घेतल्या

आज दि.20 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत झालेला पाऊस व एकूण पाऊस मिलीमीटरमध्ये  पुढीलप्रमाणे कोयना- 270 मिमी.(3928 मि.मी.),   नवजा 387 मिमी.(4822  मि.मी.),महाबळेश्वर 308 मिमी.(4508 मि.मी.),धोम 47 मिमी.( 561 मि.मी.), धोम बलकवडी 197मिमी.(2237  मि.मी.), कण्हेर 49 मिमी.(690 मि.मी.), उरमोडी 62 मिमी.( 1217 मि.मी.),तारळी  60 मिमी.(1336  मि.मी.), वीर 14 मिमी.( 210 मि.मी.)
000

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये तातडीची मदत द्या : हर्षवर्धन सपकाळ शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये तातडीची मदत द्या : हर्षवर्धन सपकाळ
आधुनिक केसरी न्यूज मुंबई : राज्यात मागील तीन चार दिवसात मुसळधार पावसाने अनेक भागात पुरस्थिती उद्भवली आहे. या पावसाचे पाणी...
कोयना धरनातून 95300 क्युसेकचा पाण्याचा विसर्ग जिल्हाधिकारी संतोष पाटील व पाटणचे तहसीलदार अनंत गुरव स्थलांतरित कुटुंबाना दिलासा
अस्मानी संकटात सापडलेल्या किनवट माहूर च्या जनतेला एकटं सोडणार नाही : कपिल नाईक
वृद्ध महिलांना पीकअपची जोरदार धडक ; एक महिला जखमी तर एक ठार
काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना मातृशोक..!
नेवासा फाट्यावर फर्निचर दुकानात भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा होरपळुन मृत्यू
पिकविम्याची वाढीव रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करून ओला दुष्काळ जाहीर करा'