दौंड च्या स्वामी चिंचोली प्रकरणातील दोन संशयित पुणे ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात..!

दौंड च्या स्वामी चिंचोली प्रकरणातील दोन संशयित पुणे ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात..!

आधुनिक केसरी न्यूज

निलेश मोरे

दौंड : दि. ५ तालुक्यातील स्वामी चिंचोली येथील अल्पवयीन मुलीच्या अत्याचार व लूट प्रकरणातील दोन्ही संशयित आरोपींना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे. समीर उर्फ लकी पठाण (वय २४, रा. माळशिरस, ता. माळशिरस), विकास नामदेव पाचपुते (वय २५, रा. भिगवण, ता. इंदापूर) दौंड व भिगवण पोलिसांच्या पथकाने ही कामगिरी केली.

पंढरपूर येथे देवदर्शनासाठी पुणे जिल्ह्यातील काही महिला व अल्पवयीन पिडीत ३० जून रोजी निघाले होते. दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे पहाटे चहा पिण्यासाठी थांबले असता दोघांनी कोयत्याचा धाक दाखवत व मिरचीची पुड डोळ्यात टाकत महिलांच्या अंगावरील दीडलाख रुपयांचे सोन्याचे दागिने लुटले. तसेच १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला गाडीतून फरकटत आडबाजूला नेत तिच्यावर अत्याचार केला. याघटनेने जिल्ह्यात तसेच राज्यात खळबळ उडाली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी घटनास्थळाला भेट देऊन तपासाची चक्रे फिरवली. जवळपास दहा पथकामार्फत या घटनेचा तपास सुरू होता. याचे पडसाद विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात देखील उमटले होते. आमदार राहुल कुल यांनी आरोपींना अटक करून कठोर शिक्षा मिळावी, अशी मागणी केली होती. घटनेला पाच दिवस उलटून गेले तरी पोलिसांच्या हाती काही धागेदोरे मिळत नव्हते. अखेर या घटनेचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे ज्या स्वामी चिंचोली भागात ही घटना घडली होती, त्या भागात जवळच असलेल्या एका मठात हे आरोपी लपून बसले होते आसे समजते.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

दौंड च्या स्वामी चिंचोली प्रकरणातील दोन संशयित पुणे ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात..! दौंड च्या स्वामी चिंचोली प्रकरणातील दोन संशयित पुणे ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात..!
आधुनिक केसरी न्यूज निलेश मोरे दौंड : दि. ५ तालुक्यातील स्वामी चिंचोली येथील अल्पवयीन मुलीच्या अत्याचार व लूट प्रकरणातील दोन्ही...
मानवत मध्ये धारदार हत्याराने सपासप वार केलेल्या 'त्या' तरुणाचा मृत्यू
पाचोरा बस स्थानकात गोळीबाराचा थरार एक ठार..!
चंद्रपूर आणि घुग्घूसमधील हजारो घरांचे मालकी हक्क रखडलेले, स्थायी पट्टे द्या : आ.किशोर जोरगेवार
श्रींची पालखी पंढरपुरात दाखल ! 33 दिवसात 9 जिल्ह्यातून 750 किमी पायी वारी..!
नमामि गोदावरी कृती आराखडा अंमलबजावणी; जिल्हाप्रशासनातर्फे गोदावरी स्वच्छतेसाठी सामंजस्य करार
तालिका सभाध्यक्ष चेतन तुपे यांनी अध्यक्ष स्थानावर बसून केलेल्या राजकीय शेरेबाजीवर विरोधकांनी घेतला आक्षेप अध्यक्ष पदाची गरिमा ही राखली पाहिजे