महिला किर्तनकार यांचे हत्येचा गुन्हा उघडकीस; दोन आरोपी जेरबंद..!

महिला किर्तनकार यांचे हत्येचा गुन्हा उघडकीस; दोन आरोपी जेरबंद..!

आधुनिक केसरी न्यूज

वैजापूर : दि.२७ जून रोजी पोस्टे विरगांव हददीतील मौजे चिंचडगाव शिवारात शेत गट नंबर ५९ मध्ये असलेल्या सदगुरू नारायणगिरी आश्रम येथील मोहटा देवी माता मंदिरात चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी मंदिराचे गेटचे लॉक तोडून मंदिरातील दानपेटी, छोटया मुर्त्या व इतर साहित्य चोरी करून मंदिराजवळच पत्र्याचे शेड बाहेर झोपलेल्या महिला प्रवचनकार/किर्तनकार संगीताताई अण्णासाहेब पवार महाराज यांच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याची घटना घडली होती.

यावरून त्यांचे भाऊ कृष्णा अण्णासाहेब पवार यांचे फिर्यादी वरून पोस्टे विरगांव गुरनं. १८७/२०२५ कलम १०३, ३३१ (८), ३०५, ३३१ (४) भारतीय न्याय संहिता अन्वये अज्ञात इसमाविरुध्द मोहटा देवी माता मंदिराचे कुलूप तोडून मंदिरात प्रवेश करून चोरी व बहीण प्रवचनकार/किर्तनकार संगिताताई अण्णासाहेब पवार महाराज यांचा दगड डोक्यात टाकून खुन केला मजकुराचे फिर्यादवरून गुन्हा दाखल झाला होता.

या प्रकरणाचे गांर्भीय ओळखून गुन्हयांचे अनुषंगाने पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण  डॉ. विनयकुमार मे. राठोड व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अन्नपूर्णा सिंह छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक स्था.गु.शा विजयसिंह राजपूत यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे व सपोनि शंकर वाघमोडे पोस्टे विरगांव यांचे वेगवेगळे तपास पथक तयार करून त्यांना मार्गदर्शन करून गुन्हयातील आरोपीचा शोध घेवुन गुन्हा उघडकीस आणत कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे व पोस्टे विरगांव यांचे पथकास दिनांक 1 जुलै रोजी सायंकाळी गोपनीय माहिती मिळाली की गुन्हयातील संशयीत वर्णनासास्खा मिळता जुळता दिसणारा एक व्यक्ती गणेश भेळ सेंटर महालगाव शिवारात फिरत आहे अशी माहिती मिळताच माहितीची खात्री करणे कामी स्थागशा पोनि विजयसिंह राजपूत व सपोनी वाघमोडे, सपोनि पवन इंगळे यांच्यासह पथक रवाना झाले. सदर संशयीत व्यक्तीस गणेश भेळ सेटर महालगाव येथून चौकशी ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव गांव विचारून अधिक चौकशी केली असता त्यांने त्याचे नाव संतोष उर्फ भायला पिता जगण चौहान वय २२ वर्ष रा. अंछली ता. सेथवा जिल्हा बडवाणी राज्य मध्यप्रदेश ह. मु. गाढे पिंपळगाव ता. वैजापूर (मजुरी साठी आला होता मागील वर्षभरापासून) असल्याचे सांगून त्याने त्याचा साथीदार अनिल उर्फ हाबडा पिता नारायण विलाला वय २३ वर्ष रा. अंछली ता. सेधया जिल्हा बडवाणी राज्य मध्यप्रदेश याच्यासह केल्याची कबली दिली. तसेच अनिल विलाला हा त्याचे गावी पळून गेल्याचे सांगितले. यावरून पोनि स्थागशा यांनी एक पथक तात्काळ मध्यप्रदेशकडे रवाना केले. सदर तपास पथकाने त्याचा शोध घेवून त्यास मध्यप्रदेश बॉर्डर वर शिरपूर येथन ताब्यात घेऊन त्यास विश्वासात घेवून अधिक चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा साथीदार संतोष उर्फ भायला पिता जगण चौहान याच्यासह केल्याची कबुली दिली. प्राथमिक तपासामध्ये  गुन्हा त्यांनी चोरी करण्याचे उददेशाने केला असल्याचे कबूल केले आहे. पुढील कायदेशीर कार्यवाही त्यांना पोलीस ठाणे विरगाव येथे हजर करण्यात आले आहे.

हि कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार मे. राठोड,अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधीकारी भागवत फुंदे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  विजयसिंह राजपूत, सपोनि शंकर वाघमोडे (प्रभारी अधिकारी विरगांव), स्थागुशा पथकाचे सपोनि संतोष मिसळे, सपोनि पवन इंगळे, सपोनि सुधीर मोटे, पोह वाल्मीक निकम, विठठल डोके, शिवानंद बनगे, अशोक वाघ, गोपाळ पाटील, महेश बिरूटे, योगेश तरमाळे, जीवन घोलप, चालक संजय तांदळे, निलेश कुडे तसेच पोह विजय ब्राम्हदे, गणेश पंडूरे, रावते, अभंग, चालक जिरे यांनी केली आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

महिला किर्तनकार यांचे हत्येचा गुन्हा उघडकीस; दोन आरोपी जेरबंद..! महिला किर्तनकार यांचे हत्येचा गुन्हा उघडकीस; दोन आरोपी जेरबंद..!
आधुनिक केसरी न्यूज वैजापूर : दि.२७ जून रोजी पोस्टे विरगांव हददीतील मौजे चिंचडगाव शिवारात शेत गट नंबर ५९ मध्ये असलेल्या...
वसमत मध्ये काॅंग्रेसला धक्का; डॉ.क्यातमवार शिंदे सेनेत सामील
अजित पवारांनी विरोधकांचा असा घेतला समाचार..!
राज्यात वीज पडून मृत झालेले शेतकरी, शेतमजूर यांना १० लाख रुपयांची मदत देण्यात यावी ; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांची मागणी..!
शक्तिपीठ महामार्गाच्या प्रकल्पासाठी पैसे दिले जातात ,पण शेतकरी कर्जमाफीसाठी पैसे नाही का?
अंबाडी घाटात बस व बोलेरो च्या भीषण अपघातात एक ठार
नरेंद्र मोदी भाजपा व बबनराव लोणीकरांचे बाप असू शकतात शेतकऱ्यांचे नाही: नाना पटोले