राशन दुकानातून मिळणाऱ्या धान्याच्या गैरप्रकाराला आळा घाला : आमदार देवराव भोंगळे यांची विधानसभेत मागणी
आधुनिक केसरी न्यूज
चंद्रपूर : पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या सहाव्या दिवशी कामकाजात सहभागी होत प्रशोन्नतरे या संसदीय आयुधावर बोलतांना, राजुरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवराव भोंगळे यांनी भंडारा जिल्ह्यात स्वत धान्य दुकानांच्या माध्यमातून संबंधित दुकानदार तसेच दलाल संगनमत करून लाभार्थ्यांच्या वाट्याचा तांदुळ परस्पर मोठ्या व्यावसायिकांना विकतात आणि त्यामधून मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार सुरू असल्याच्या तक्रारी समोर येत असल्याची माहिती विधानसभेत दिली. यासंदर्भात विविध वृत्तपत्रांतही तशा स्वरूपाच्या बातम्या प्रकाशित झाल्या असल्याचेही त्यांनी सभागृह सदस्यांच्या लक्षात आणून दिले. शासनामार्फत गोरगरिबांना धान्य देण्याची योजना केंद्र शासनामार्फत तसेच राज्य शासनामार्फत या देशात राबविली जाते. ८० करोड लोकांना मोफत धान्य दिले जात. एका माणसाला पाच किलो धान्य देण्याचा एक चांगला उपक्रमही सरकारच्या माध्यमातून राबविला जात आहे. परंतु राशन दुकानाच्या माध्यमातून मिळणारे हे धान्य लाभार्थ्यांना न मिळता मोठे दुकानदार किंवा व्यावसायिकांना विकल्या जात आहे अशी माहिती त्यांनी यावेळी सभागृहामध्ये दिली. त्यामुळे शासन या गंभीर विषयाकडे तातडीने लक्ष घालून केंद्र व राज्य सरकारच्या अशा लोककल्याणकारी योजनांच्या आड होत असलेल्या या गैरप्रकारांना वेळीच आळा घालण्यासाठी काय उपाययोजना करणार आहे? असा प्रश्न सभागृहात आमदार भोंगळे यांनी सभागृहात उपस्थित केला.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List