लेफ्टनन कर्नल वीर जवान अथर्व कुंभार यांना विरमरण पलूस वर शोककळा, साश्रू नयनांनी अंत्यसंस्कार
आधुनिक केसरी न्यूज
दिनेश कांबळे
पलूस : तालुक्याच्या मातीतील सुपुत्र आणि संपूर्ण समाजाचा अभिमान असलेले वीर जवान अथर्व संभाजी.कुंभार यांना वीरमरण प्राप्त झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली आहे. गया (बिहार) मिलिटरी ऑफिसर ट्रैनिंग येथील अकॅडमी मध्ये सरवादरम्यान हिट स्ट्रोक मुळे त्यांना विरमरण आले, अथर्व यांचे इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतचे शिक्षण किर्लोस्कर हायस्कूल, किर्लोस्करवाडी येथे झाले. पुढे त्यांनी अण्णासाहेब डांगे अभियांत्रिकी महाविद्यालय, आष्टा येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी इन्फोसिस या नामवंत आयटी कंपनीमध्ये दोन वर्षे सेवा केली.
पण मनामध्ये देशसेवेची तीव्र ओढ असल्याने त्यांनी आयटी क्षेत्र सोडून थेट भारतीय सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला. या धाडसी निर्णयाने त्यांनी लाखोंना प्रेरणा दिली.
अथर्व कुंभार हे एक सुसंस्कारित आणि देशभक्त कुटुंबातून होते. त्यांचे चुलते अरुण कुंभार ,पलूस सहकारी बँकेचे माजी संचालक म्हणून काम केले व शिवाजी कुंभार हेही परिसरात आदराने पाहिले जाणारे व्यक्तिमत्व आहेत.त्यांचा ट्रॅक्टर ट्रॉली तयार करणे फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे
अथर्व यांच्या निधनामुळे कुंभार कुटुंबावर आणि संपूर्ण समाजावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. परंतु त्यांच्या पराक्रमाची आठवण आणि अभिमान कायमस्वरूपी प्रत्येकाच्या मनात कोरलेली राहील.अथर्व च्या जाण्याने पलूसच्या मातीतला एक तेजस्वी तारा आज देशासाठी लढताना निखळला...
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List