सततच्या पावसामुळे वरोडा तालुक्यातील अनेक मार्ग बंद

नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

आधुनिक केसरी न्यूज

 वरोडा : 9/7/2025 वरोडा तालुक्यात सतत तीन दिवसापासून होत असलेल्या पावसामुळे तालुक्यातून वाहणाऱ्या वर्धा नदीच्या पातळीत वाढ होत आहे.यामुळे नदीच्या काठावर असलेल्या गावांना याची झळ पोहचू शकते. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.प्रशासन तालुक्यातील सरपंच, पोलीस पाटील व इतर शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपर्कात असून पावसामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. वर्धा नदीच्या पातळीत वाढ होत असून सो स्वीट कोसारा हा मार्ग बंद आहे. याव्यतिरिक्त परिस्थिती नियंत्रणात आहे. आतापर्यंत कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नसून नदीकाठच्या तुळाणा, सोईट,करंजी,मार्डा इत्यादी गावांना सतर्कतेचा इशारा दिला असल्याची माहिती वरोड्याचे तहसीलदार योगेश  कौटकर यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली. सतत होत असलेल्या पावसामुळे सोईट येथील वर्धा नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने सोईट-कोसारा रस्ता बंद झाला आहे.तसेच नागरी येथील वर्धा नदीवर असलेल्या पुलालाही पाणी टेकण्याची शक्यता आहे. पाऊस असाच पडत राहिल्यास नागरी हिंगणघाट मार्गही बंद होण्याची शक्यता आहे. माढेळी-  गिरसावळी या मार्गावरील नाल्यावर असलेल्या पुलावरून पाणी वाहत आहे. डोंगरगाव-चिकणी या दरम्यान असलेल्या पुलावरून पाणी आल्याने हाही मार्ग बंद आहे. साखरा-पारडी हा मार्गही सकाळ पर्यंत बंद होता.

       शेगाव पोलिस अंतर्गत असलेला माकोना- सावरी हाही मार्ग बंद आहे. बंद असलेल्या मार्गावरील बस वाहतूक थांबण्यात आली असल्याने या मार्गावरील ग्रामस्थांना याचा फटका बसला आहे.
तालुक्यातील वरोडा-चरूरखटी मार्गावरील तास नदीवर असलेल्या पुलावर पाणी असल्याने तोही रस्ता बंद असल्याची माहिती चरूरखटीचे उपसरपंच विवेक नांदे यांनी दिली. ग्रामपंचायतीतर्फे तास नदीवरील पुल व रस्त्याच्या संबंधांमध्ये आपण संवर्ग विकास अधिकारी यांना पत्र दिले असूनही त्यावर अजून पर्यंत कोणतीच कोणतीच कारवाई  पर्यंत झाली नसल्याची माहिती त्यांनी दिली.
 लालनाला प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात सतत होत असलेल्या पावसामुळे प्रकल्पाच्या जलाशय पातळीत वाढ झाल्याने चंद्रपूरच्या कार्यकारी अभियंता यांच्या आदेशानुसार लालनाला धरणाचे दोन दरवाजे आज सकाळी ७.३० वाजता १० सेंटिमीटरने उघडण्यात आले असून त्यातून 9. 38 घनमीटर प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे लालनाला पोथरा नदी व वर्धा नदीकाठच्या गावांना सतत सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

ब्रह्मपुरी तालुक्यात 10 जुलै रोजी शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर ब्रह्मपुरी तालुक्यात 10 जुलै रोजी शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
आधुनिक केसरी न्यूज चंद्रपूर : दि. 09 जुलै भारतीय हवामान खात्याने 7 जुलै 2025 रोजी चंद्रपूर जिल्ह्यासाठी “ऑरेंज अलर्ट” जारी...
ट्रॅव्हल्स चे धडकेत पिकअप मधील माशांचा समृद्धीवर पाऊस
सततच्या पावसामुळे वरोडा तालुक्यातील अनेक मार्ग बंद
नागरिकांनी सुरक्षेची काळजी घ्यावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन
राज्यातील ८५ वीज कामगार,अभियंते,अधिकारी व कंत्राटी कामगारांचा सहभाग 
पावसामुळे मोहाडीत घराची भिंत कोसळली;  बांधकाम सभापती डॉ. लक्ष्मण भगत पोहोचले मोहाडी गावात
त्या गरोदर मातांना ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले