पंढरपूरहून परतताना भिगवणमध्ये दुचाकीला अज्ञात टँकर वाहनाची धडक ; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू,पत्नी गंभीर जखमी
आधुनिक केसरी न्यूज
निलेश मोरे
पुणे : दि. 6 सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर तालुक्यातील भिगवण मध्ये दुचाकीला पाठीमागून आलेल्या भरधाव टॅंकरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर पाठीमागे बसलेली पत्नी गंभीर जखमी झाली आहे.मृत दुचाकीस्वाराचे नाव मल्हारी बाजीराव पवार(वय-५७वर्षे) तर जखमी पत्नी चे नाव पंखाबाई मल्हारी पवार (वय ५० वर्षे)(दोघेही राहणार.येळपणे पोलीस वाडी,ता.श्रीगोंदा,जि.अहिल्यानगर)असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मृत मल्हारी पवार हे आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर ला विठ्ठलाच्या दर्शनासाठी काल गेलेले होते. तर त्यांची पत्नी या पायी वारी करत पंढरपूरला पोहोचल्या होत्या.दोघांनी विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर पती-पत्नी आपल्या दुचाकीवरून (एमएच.१६ए जी २३४३) आपल्या गावी येळपणे निघाले होते. दरम्यान त्यांची दुचाकी सकाळी साडे नऊच्या दरम्यान भिगवण गावच्या हद्दीतुन जाणाऱ्या पुणे सोलापूर महामार्गालगत असणाऱ्या रवींद्र सेल्स या दुकानाच्या समोरून सोलापूर पुणे लेनवरन जात असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात टँकर ने पवार यांच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली धडक दिल्यानंतर मृत मल्हारी पवार हे दुचाकीवरून खाली पडल्यानंतर त्यांच्या डोक्यावरून टँकरचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांच्या पत्नी पंखाबाई पवार या गंभीर जखमी झाल्या. अपघातानंतर टँकर चालक हा जखमींना मदत करण्याऐवजी तिथून आपल्या ताब्यात टँकर घेऊन पसार झाला. अपघाताची माहिती कळताच आपुलकीची सेवा ॲम्बुलन्सचे मालक केतन वाघ यांनी आपल्या ॲम्बुलन्स मधून जखमी पारूबाई पवार यांना लाईफ लाईन दवाखान्यामध्ये दाखल केले. अज्ञात टँकर चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम भिगवण पोलीस ठाण्यात चालू होते.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List