महापालिकेत एकहाती सत्ता आणू : पालकमंत्री अशोक उईके

आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात मनपा निवडणूक आढावा बैठक, नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार

महापालिकेत एकहाती सत्ता आणू : पालकमंत्री अशोक उईके

आधुनिक केसरी न्यूज

चंद्रपूर : आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वावर आमचा पूर्ण विश्वास आहे. आज येथे मोठ्या संख्येने जमलेला कार्यकर्ता वर्ग याची साक्ष देणारा आहे. आजच्या बैठकीत कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर पक्षाच्या माध्यमातून जनतेसाठी काम करण्याची दिसणारी जिद्द आणि विजयाचा संकल्प या भरोशावर येणाऱ्या महापालिका निवडणुकीत एकहाती सत्ता आणू, असे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांनी केले. आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्ष चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने कन्यका सभागृहात मनपा निवडणूक आढावा बैठक, महानगर अध्यक्ष आणि नवनियुक्त मंडळ अध्यक्ष सत्कार समारंभ तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह नियोजनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमाला आमदार किशोर जोरगेवार, महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, भाजप नेते अशोक जिवतोडे, माजी महापौर राखी कंचर्लावार, माजी उपमहापौर अनिल फुलझले, नेते विजय राऊत, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर आहिर, माजी नगरसेवक संजय कंचर्लावार, माजी संत मनीष महाराज, तुषार सोम, दशरथसिंह ठाकूर, नामदेव डाहुले, रवी आसवानी, ऍड. सुरेश तालेवार  राजेंद्र अडपेवार, अरुण तिखे,  राहुल घोटेकर, श्याम कणकम, रवी गुरनूले, शीतल गुरनूले, कल्पना बबूलकर, वंदना तिखे, शीतल आश्राम, माया उईके, सारिका नंदुरकर, वंदना जांभुळकर, शीला चौव्हाण, शीतल कुळमेथे, संगीता खांडेकर, आशिष मासिरकर, वंदना हातगावकर, सविता दंढारे, सायली येरणे, अमोल शेंडे, राशिद हुसेन, जितेश कुळमेथे, करणसिंह बैस, कार्तिक बोरेवार, संजय तिवारी आदींची उपस्थिती होती.यावेळी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार यांच्यासह नवनियुक्त मंडळ अध्यक्ष सुभाष अदमाने, स्वप्निल डुकरे, रवी जोगी, सारिका नंदुरकर, प्रदीप किरमे यांचा पालकमंत्री अशोक उईके आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यानंतर पुढे बोलताना पालकमंत्री ना. उईके म्हणाले की, भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. येथे कार्यकर्त्यांना नेहमीच सन्मान दिला जातो. मात्र पक्षात काम करत असताना कार्यकर्त्यांसाठी एक संस्कारपूर्ण आचारसंहिता आहे. जनतेची कामे करताना सौजन्याने वागले पाहिजे. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला पक्ष नेहमीच त्याच्या कामाची पावती देतो. आपण काम करत असताना पक्षाचा विचार आणि धोरण प्रत्येक घरी पोहोचविले पाहिजे. चंद्रपूर जिल्ह्यात पक्ष खूप मोठा झाला आहे. कार्यकर्त्यांसाठी समर्पित असलेले किशोर जोरगेवार यांसारखे नेतृत्व आपल्याला लाभले आहे. या ताकदीवर आपण सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकून पक्ष अधिक बळकट करू, असा विश्वास यावेळी पालकमंत्री उईके यांनी व्यक्त केला.

*नव्या पदाधिकाऱ्यांसह पक्षाच्या नव्या संघटन पर्वाची सुरुवात – आ. किशोर जोरगेवार*

नवीन मंडळ अध्यक्षांची आपण निवड केली आहे. या मंडळ अध्यक्षांना सोबत घेऊन महानगर अध्यक्षांनी जनतेचे प्रश्न सोडविण्याचे काम करावे. भारतीय जनता पक्ष हा केवळ व्यक्तीकेंद्रीत पक्ष नाही. हा पक्ष म्हणजे विचार, मूल्ये आणि जनसेवेचा सातत्यपूर्ण ध्यास आहे. प्रत्येक कार्यकर्ता हा पक्षाची ऊर्जा आहे. पक्षाची धोरणे आणि विचार प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्याची मोठी जबाबदारी तुमच्यावर आहे.
आपल्या समोर महानगरपालिकेच्या निवडणुका उभ्या आहेत. ही केवळ निवडणूक नाही, तर आपल्या कामाचं आणि सेवाभावाचं मूल्य जनतेसमोर मांडण्याची संधी आहे. पक्षाच्या संघटनेत नवीन दमदार नेतृत्वाची भर पडली आहे. मंडळ अध्यक्ष नुकतेच नव्याने नियुक्त झाले आहेत. तुमच्यावर पक्षाने मोठा विश्वास टाकला आहे. हा विश्वास म्हणजे जबाबदारी, सेवा आणि समर्पण याचं प्रतीक आहे. मंडळ हे संघटनेचं मूलभूत स्तर आहे. आपल्या सोबत असलेला जनतेचा विश्वास आणखी दृढ करत एकजुटीने, निर्धाराने आणि आत्मविश्वासाने पुढे जाण्याचे आवाहन यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्याम हेडाऊ यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

6 जुलै ते 8 जुलै ,2025 या कालावधीत चंद्रपूर  जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट  6 जुलै ते 8 जुलै ,2025 या कालावधीत चंद्रपूर  जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट 
आधुनिक केसरी न्यूज   नागपूर : प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार दिनांक 6 जुलै ते 8 जुलै , 2025 या कालावधीत...
महाराष्ट्रधर्म..थांबलाच नाही..साखळी कधी तुटली नाही! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
महापालिकेत एकहाती सत्ता आणू : पालकमंत्री अशोक उईके
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मानाचे वारकरी दाम्पत्य श्री.कैलास दामू उगले व श्रीमती कल्पना कैलास उगले यांचा सत्कार
पंढरपूरहून परतताना भिगवणमध्ये दुचाकीला अज्ञात टँकर वाहनाची धडक ; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू,पत्नी गंभीर जखमी
आषाढवारीत लाखो वारकरी नाथचरणी नतमस्तक ;मात्र पाऊस नसल्याने शेयकर्यांची चिंता वाढली 
पालकमंत्र्यांकडून आदिवासी विकास विभागाचा आढावा