श्री रेणुका देवी मंदिर घाटात भाविकांची कार ५० फूट खोल दरीत कोसळली; सहा भाविक किरकोळ जखमी

श्री रेणुका देवी मंदिर घाटात भाविकांची कार ५० फूट खोल दरीत कोसळली; सहा भाविक किरकोळ जखमी

आधुनिक केसरी न्यूज

बजरंगसिंह हजारी

माहूर : दि. 30 मे प्रसिद्ध तिर्थक्षेत्र देवभूमी माहूर गडावरील आदिशक्ती आदिमाया श्री रेणुकादेवीच्या दर्शनासाठी आलेले  मंगरूळ दस्तगीर येथील सहा भावीक दर्शनादी करून आपल्या कारने परत जात असताना सुरू असलेल्या जोराच्या पावसामुळे रस्त्याचा नीट अंदाज न आल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघाती वळणरस्ता म्हणून ओळखला जाणाऱ्या घातक  'यु टर्न' जवळ सदरील अनियंत्रित कार उसळून सरळ ५० फूट खोल थेट दरीत कोसळल्याची क्षणभर काळजाचा ठोका चुकविणारी अत्यंत थरारक अपघाताची घटना गुरुवारी रात्री १०:३० वाजताच्या सुमारास घडली.नशिब बलवत्तर म्हणून रात्रीच्या काळ्याकुट्ट अंधारात घनदाट जंगलातील खोल दरीत एवढ्या उंचीवरून खाली कोसळल्यानंतर अपघातग्रस्त कार झाडांना अडकल्याने कारमधील सहा भाविक किरकोळ जखमी होऊन बालंबाल बचावले व मोठा अनर्थ टळल्याने ''देव (झाड) तारी त्याला कोण मारी!' या उक्तिची प्रचिती आली.

माहूर गडावरील श्री रेणुका माता मंदिराच्या पायथ्याशी असलेला भगवान श्री परशुराम मंदिराकडे जाणारा रस्ता नुकताच बनविण्यात आला असून,कठीण नागमोडी वळणरस्ता हा भाविकांसह सर्वच वाहनचालकांसाठी दिवसेंदिवस अपघात पॉईंट ठरत चालला आहे.
इंग्रजी वर्णाक्षर 'यु'  आकाराच्या नागमोडी कठीण वळणावरून वाहन चालवताना चालकांना एकाचवेळी गाडीचा वेग, बाजु, तोल व लक्ष या चौफेर बाबतीत दक्ष राहत अगदी कसरत करत वाहन चालवावे लागते. त्यात आता भरीवर भर म्हणून या वळणावरती सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या काठावर लावलेल्या सुरक्षा रक्षक कठड्याच्या प्लेटा काढण्यात आल्याने अनेक वाहने तेथे अपघातग्रस्त झाल्याच्या घटना घडल्या आहेत. गुरुवारी रात्री मान्सूनपूर्व अवकाळी पावसाचा तडाखा परिसरात जोर धरुन होता. 
दरम्यान, अमरावती जिल्ह्याच्या धामनगाव (रेल्वे) तालुक्यातील  मंगरूळ दस्तगीर येथील काही भाविक देवदर्शनानंतर रात्री साडेदहाच्या सुमारास परतीच्या प्रवासाला निघाले होते.सदरील अपघात वळणावरून कार जात असताना जोरदार पावसामुळे चालकास रस्त्याचा नीट अंदाज न आल्याने कार सरळ ५० फूट खोल दरीत कोसळली.कार मध्ये बसलेले सौरभ महेंद्र मरोडकर वय (२७), आकाश गजानन खालकोने वय (२८), सुयोग सुरेंद्र चव्हाण (२८), रोशन शरदराव मरोडकर (३३), अक्षय प्रमोद हळदे (२७), भूषण संदीपराव पिंपळे( २५) सर्व राहणार मंगरूळ दस्तगीर हे कारमधील सहा जण कार चक्क झाडाला अडकल्याने कार खोल दरीत न गेल्याने केवळ किरकोळ जखमी झाले व  मोठा अनर्थ टळला. 'देव ( झाड) तारी त्याला कोण मारी!' या उक्तिप्रमाणे  अपघातग्रस्त कार आणि खोल दरी च्या मधात ' झाडं ' साक्षात देवदुत बनून उभी राहिल्याने हे सहाही जण म‌त्युच्या दाढेतून अगदी थोडक्यात बचावले. भयाण रात्रीची वेळ आणि सुरू असलेल्या पावसामुळे यावेळी या मार्गावरुन वाहतूक थंडावलेली असल्यामुळे दुर्दैवाने या अपघातवेळी याठिकाणी बचावासाठी कोणीही उपलब्ध नव्हते. अपघातातील जखमींनी कसेबसे रस्त्यावर येऊन एका खाजगी वाहनाद्वारे माहूर येथील ग्रामीण रुग्णालय गाठले. येथे वैद्यकीय अधीक्षक डॉ.किरण कुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.अक्षय वाठोरे यांनी सर्व जखमींवर प्रथमोपचार करून त्यांना त्यांचे गावी सुखरुप परत पाठविले.

श्रीक्षेत्र माहूर शहरापासून ते रेणुका माता मंदिर आणि श्री दत्त शिखर संस्थान पर्यंतचा ७ किलोमीटर अंतर असलेला उंच आणि नागमोडी कठीण घाट वळणदार रस्ता हा अनेक ठिकाणी नादुरुस्त असून, कठीण वळणावरील सुरक्षा भिंत, सुरक्षा कठडे अनेक ठिकाणी उकडलेल्या अवस्थेत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची  पाहणी करून तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी भाविकांसह वाहनचालकांकडून होत आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

दरोडेखोरांची आंतरजिल्हा टोळी जेरबंद..! दरोडेखोरांची आंतरजिल्हा टोळी जेरबंद..!
आधुनिक केसरी न्यूज वसमत : स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली यांनी फ्लिपकार्ट पार्सल वाहन महामार्गावर अडवुन दरोडा टाकणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद...
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण
पतंजली योग जिल्हा सहप्रभारी पदी अविनाश गायकवाड यांची निवड..!
"विद्यापीठ आपल्या गावात" अंतर्गत कौशल्याधिष्ठित शिक्षणासह पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगला रोजगार मिळेल : डॉ. श्याम खंडारे
विद्यार्थ्यांना एसटी पास थेट शाळेत मिळणार ;परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती 
ब्रेकिंग... नागभीड ब्रम्हपुरी मार्गावर उद्या मेगा 15 जून ब्लॉक
बोअरवेलवाहक ट्रकची दुचाकीस जबर धडक ; दुचाकीवरील दोघे गंभीर, यवतमाळला हलविले