साक्री पोलिसांची १५ वाहनांवर कारवाई; पहिल्याच दिवशी अकरा हजाराचा दंड वसूल
आधुनिक केसरी न्यूज
चंद्रशेखर अहिरराव
साक्री : पोलीस स्टेशन मार्फत बेशिस्तपणे चालवणाऱ्या वाहनधारकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. पोलीस स्टेशन समोरच नाकाबंदी करून विविध बेशिस्तपणे वाहन चालवणाऱ्या वाहनधारकांकडून दंड वसुली करण्यात आली. यावेळी १५ विविध वाहने नियमांचं उल्लंघन करत असल्याचे आढळून आले म्हणून त्यांच्यावर दंडाची कारवाई करण्यात आली.
साक्री धुळे मार्गावर नाकाबंदी करण्यात आली. त्यानुसार वाहनांची कागदपत्रे, नंबर, प्लेट, चालकाचा वाहन परवाना, दुचाकी वरील तीन सेट, करण कर्कश आवाज करत ध्वनी प्रदूषण पसरवणारे सायलेन्सर, वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने पार्किंग केलेली वाहने आदींची तपासणी करण्यात आली. त्यात ३५ दुचाकी, २ ट्रॅक्टर व चारचाकी वाहने १२ यांचा समावेश आहे. एकूण ४९ वाहनधारकांकडून ११ हजार रू. पेक्षा अधिक दंडाची रक्कम वसूल करण्यात आली. वाहतूक नियम न पाळणाऱ्या वाहनधारकांची तपासणी करण्यासाठी साक्री पोलीस स्टेशन कडून पथक नेमण्यात आले होते. या पथकात पोलीस निरीक्षक दीपक वळवी, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल बागुल विलास शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद रौंदळ, महेश धायतळ यांच्यासह ७ पोलीस अंमलदार यांचे पथक कारवाईसाठी सज्ज
होते. पोलीस निरीक्षक दीपक वळवी यांनी वाहनधारकांना वाहतूक सुरक्षा जागृती सप्ताह निमित्ताने आवाहन केले आहे की, वाहतूक नियमांचे पालन करा, वाहनांचे नोंदणी कागदपत्र, फॅन्सी नंबर प्लेट, विना नंबर प्लेट, ध्वनी प्रदूषण करणारे सायलेन्सर असणाऱ्या दुचाकी, मान्यतेपेक्षा अधिक सीट वाहतूक करणारी वाहनेया सर्व वाहतूक नियमांबाबत जनतेने जागरूक राहावे. तसेच अल्पवयीन मुलांकडे वाहने देऊ नये, वाहतुकीला अडथळा होईल अशा ठिकाणी वाहने पार्किंग करू नये, वाहनपरवाना असल्या शिवाय वाहने चालवू नये असेही पोलीस निरीक्षक वळवी यांच्या कडून आवाहन करण्यात आले आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List