बस- दुचाकीची समोरासमोर धडक; दोघांचा मृत्यू, चिमुकली बचावली

बस- दुचाकीची समोरासमोर धडक; दोघांचा मृत्यू, चिमुकली बचावली

आधुनिक केसरी न्यूज

देगलूर : तालुक्यातील हानेगाव परिसरात शनिवारी सकाळी भीषण अपघात घडला. वझर ते कुंदराळा राज्य मार्गावर औराद-वझर कॉर्नरवर एसटी बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन दोघांचा मृत्यू झाला. या अपघातातून दुचाकी चालक आणि तीन वर्षांची चिमुकली बचावल्याने सुदैवच म्हणावे लागेल.प्राप्त माहितीनुसार, शनिवारी (दि. १२) सकाळी ११ वाजेच्या सुमारास वझरमार्गे उदगीरकडे जाणाऱ्या एसटी बस (क्र. एमएच-२० बीएल-१९८३) आणि दुचाकी (क्र. एमएच-२६ एपी-१३७७) यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. दुचाकीवर चार जण प्रवास करत होते. या अपघातात नरसिंगराव एकनाथराव पाटील (७०, रा. कामाजी वाडी) आणि पुंडलिक पाटील (७५, रा. कुडली) यांचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला.

दुचाकी चालक वामनराव नारायण बिरादार (६०) आणि शिवानी संदीप बिरादार (वय ३) या चिमुकलीला किरकोळ दुखापत झाली असून त्यांचा मृत्यू टळला आहे.

अपघातानंतर मरखेलचे सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र हुंडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार डी. बी. पाटील, संदीप बोधमवाढ व माजिद पठाण यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना उपचारासाठी हलवले. हा अपघात परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, दुचाकीवर चार जण प्रवास करत असल्याने वाहतुकीच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

जायकवाडी धरणातून डाव्या कालव्यात सिंचनासाठी पाणी सोडविण्याची आ.उढाण यांची मागणी  जायकवाडी धरणातून डाव्या कालव्यात सिंचनासाठी पाणी सोडविण्याची आ.उढाण यांची मागणी 
आधुनिक केसरी न्यूज घनसावंगी : जायकवाडी धरणातून सिंचनासाठी डाव्या कालव्यामध्ये पाणी सोडण्याची मागणी आमदार डॉ हिकमत उढाण यांनी राज्याचे जलसंपदामंत्री...
अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर ‘मोक्का’ लावण्यासाठी कायद्यात बदल करण्यात येणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुढील अधिवेशनात धर्मांतर विरोधी कायदा आणणार : गृह राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर
साक्री पोलिसांची १५ वाहनांवर कारवाई; पहिल्याच दिवशी अकरा हजाराचा दंड वसूल
गोंदिया जिल्हा गुणवत्ता नियंत्रण पथकाची राज्यसीमेवर मोठी कारवाई ; 43 हजारांचा खत साठा जप्त
बस- दुचाकीची समोरासमोर धडक; दोघांचा मृत्यू, चिमुकली बचावली
राहुरीत विवाहित तरुणाची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या !