गोंदिया जिल्हा गुणवत्ता नियंत्रण पथकाची राज्यसीमेवर मोठी कारवाई ; 43 हजारांचा खत साठा जप्त
आधुनिक केसरी न्यूज
गोंदिया : महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवरील आमगाव तालुक्यातील म्हाली नाका येथे 12 जुलै रोजी सायंकाळी 4.30 ते 6 वाजेच्या दरम्यान गोंदिया जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक संतोष सातदिवे, तालुका कृषी अधिकारी महेंद्र दिहारे व त्यांच्या पथकाने संयुक्त कारवाईत ४५ बॅग युरिया खताची अवैध वाहतूक उघडकीस आणली. सदर खताची अंदाजे किंमत ₹43,064 असून, POS मशीनची पावती किंवा वैध परवाना नसताना हे खत वाहतूक करण्यात येत होते. तीन वाहनांतून युरियाचा साठा सापडला : कारवाईदरम्यान MH- 35 - AJ - 4362, MH - 35 - AJ- 3529 आणि MH- 31- DS - 2597 या तीन मालवाहतूक वाहनांत संशयास्पद हालचाली दिसून आल्याने तपासणी केली असता त्यातून युरिया खताच्या 45 बॅगा सापडल्या. सदर साठ्यावर कोणताही अधिकृत दस्तऐवज आढळून न आल्याने संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात आली.
या प्रकरणात 1)शैलेन्द्र दमाहे (रा. घंसा, ता. लांजी, म.प्र.),
2)शुभम येडे (रा. पाथरगांव, ता. लांजी, म.प्र.),3)विनोद तांबोरे (रा. बिंजली, ता. सालेकसा, जि. गोंदिया) या तीन आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तसेच, युरिया खत विक्री प्रकरणात सहभागी असलेले मंगल कृषि केंद्र व जयदुर्गा कृषि केंद्र (आमगांव) यांचे संचालकही या प्रकरणात आरोपी करण्यात आले आहेत.सदर प्रकरणात "रासायनिक खत नियंत्रण आदेश 1985" मधील कलम 4(a) तसेच "अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955" अंतर्गत कलम 3(2)(d), 3(2)(e) व 3(2)(4)(i) नुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून, आमगांव पोलीस स्टेशनचे एपीआय निलेश दाबेराव हे तपास करीत आहेत.ही कारवाई केवळ युरियाच्या अवैध वाहतुकीविरोधातच नव्हे, तर खतांच्या काळ्या बाजारावर नियंत्रण मिळविण्याच्या दृष्टीने एक मोठे पाऊल मानले जात आहे. पोलीस आणि कृषी विभागाकडून अवैध खत वितरण साखळीचा तपशीलवार शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List