माहूर तालुक्यातील एका नामांकित शाळेत सातवीच्या विद्यार्थ्यासोबत अनैसर्गिक कृृृृत्य मानवतेला काळीमा फासणारी घटना..!
"4 विधिसंघर्षितांवर माहूर पोलीसांत गुन्हा दाखल ; संस्थाचाकासह जबाबदार कर्मचा-यांना प्रकरण भोवणार"
आधुनिक केसरी न्यूज
लक्ष्मीकांत मुंडे
श्रीक्षेत्र माहूर : माहूर तालुक्यात मानवतेला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली असून तालुक्यातील एका नामांकित शाळेत सातवीच्या वर्गात शिकणा-या एका 12 वर्षीय विद्यार्थ्यासोबत अनैसर्गिक कृृृृत्य केल्याची खळबळजनक घटना घडल्याप्रकरणी माहूर पोलीस ठाण्यात 4 विधिसंघर्षितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहूर तालुक्यात दुर्गम भागातील एका गावातून माहूर तालुक्यातील लखमापूर येथील एका खाजगी शिक्षणसंस्थेच्या विद्यालयाशी संलग्न असलेल्या वस्तीगृहात राहून त्याच विद्यालयात इयत्ता सातवीत शिक्षण घेत असलेल्या 12 वर्षीय पिडीत विद्यार्थ्याच्या पित्याने माहूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा पिडीत मुलगा इयत्ता पाचवीपासून याच ठिकाणी राहून शिक्षण घेत आहे.. दरम्यान दि. १९ जुलै २०२५ रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास इयत्ता नवव्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या ४ विधीसंघर्षीत बालकांनी संगनमत करून पिडीत विद्यार्थ्याचे कपडे काढले व अनैसर्गीक कृत्य केले.. त्यावेळी एकाजण पिडीतासोबत अनैसर्गीक कृत्य करीत असताना बाकीच्या तिघांनी त्याला मदत केली. शिवाय घटनेचा व्हिडीओ देखील काढला ही विशेष बाब आहे.
विशेष म्हणजे मानवतेला काळीमा फासणा-या या घटनेचा व्हिडीओ पिडीत मुलाच्या थेट गावापर्यंत वायरल झाल्याने या घटनेची माहीती पिडीत बालकाच्या वडीलांना कळाली.. त्यानंतर ते व्हिडीओ घेवून माहूर पोलीस ठाणे गाठले... दरम्यान काल दि. ३० ऑगस्ट रोजी माहूर पोलीस ठाण्यात गु.र.नं. १५२/२०२५ कलम 3,4, 5, M, 6, 8, 12 पोक्सो. तसेच सहकलम 351 (1), 351 (2) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेतील ४ विधीसंघर्षीत बालकांपैकी दोघांना माहूर पोलीसांनी ताब्यात घेवून नियमाप्रमाणे कार्यवाही सुरू असल्याचे माहूर पोलीसांनी सांगितले आहे.. प्रकरणाचा तपास माहूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक गणेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. शरद घोडके हे करीत आहेत....
"संस्थाचाकासह मुख्याध्यापक व अधिक्षकाला प्रकरण भोवणार..."
विशेष म्हणजे सदरील विद्यालयासह वस्तीगृह हे राष्ट्रीय महामार्गाच्या लगत असून संस्थाचालक हा एका राजकीय गटाचा स्वयंघोषित नेता आहे. तर रेती वाहतूकदारांकडून हप्ता वसूली करण्याच्या नादात त्याचा 'न भुतो न् भविष्यती' असा सत्कार करतानाचे व्हिडीओ देखील प्रचंड वायरल झाले होते.. एवढेच नव्हे तर बोगसगीरी करण्यात पटाईत असलेल्या 'त्या' पाढरपेशा संस्थाचालकाकडून प्रकरण दाबण्याच्या दृष्टीने अतोनात प्रयत्न सुरू असल्याचे पिडीत विद्यार्थ्याच्या गावातून सांगण्यात येत असून प्रकरणात अत्याचार करणारे 'ते' विधीसंघर्षीत बालके आपल्या विद्यालयाचे विद्यार्थीच नसल्याचे दाखवण्यासाठी कागदोपत्री खटाटोप सुरू असल्याची गोपनीय चर्चा सध्या विद्यालयपरिसरात ऐकायवयास मिळत आहे... एकंदरीतच सदर प्रकरणाचे गांभीर्य पाहता घटनेच्या दिवशी वस्तीगृहाचा अधिक्षक नेमका कुठे होता..? वस्तीगृहावर नियंत्रण व देखभाल ही मुख्याध्यापकाची जबाबदारी नाही का..? संस्थाचालकाचे कार्य फक्त फोटो काढण्यापुरते व शासनाचे अनुदान उचलण्यापुरतेच असते का..? अशा विविध प्रश्नांना पेव फुटले असून सदरचे प्रकरण मात्र त्याच स्वयंघोषीत संस्थाचालकास चांगलेच अडचणीत टाकणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List