पोलीस महानिरीक्षकांनी घेतली आमदार करण देवतळे यांची भेट

पोलीस महानिरीक्षकांनी घेतली आमदार करण देवतळे यांची भेट

आधुनिक केसरी न्यूज

वरोडा : पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील हे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी वरोडा भद्रावती विधानसभा क्षेत्राचे आमदार करण देवतळे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान पोलीस प्रशासनाद्वारे समाजात कायदा सुव्यवस्था राखणे तसेच जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टीने सुरू असलेले प्रयत्न व चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासासंदर्भात त्यांनी आमदार महोदयांशी सविस्तर चर्चा केली. नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळावे.कायदा व सुव्यवस्था मजबूत व्हावी यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधी यांचा समन्वय अधिक प्रभावी ठरेल असा विश्वास यावेळी आमदार करण देवतळे यांनी व्यक्त केला. आपल्या चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यामुळे जनतेत विश्वास दृढ झाला असून प्रशासन व नागरिक यांच्यातील परस्पर नाते अधिक सक्षम होण्यास मदत होईल असे मत यावेळी महानिरीक्षक संदीप  पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन हेही त्यांच्यासोबत होते.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

महालक्ष्मी पूजनाचा खरा अर्थ महालक्ष्मी पूजनाचा खरा अर्थ
आधुनिक केसरी न्यूज ज्येष्ठा गौरी आवाहन हा गणपतीमध्येच अतिशय धूमधडाक्यात साजरा होणारा उत्सव आहे. या उत्सवामध्ये गौरीची पूजा केली जाते....
माहूर तालुक्यातील एका नामांकित शाळेत सातवीच्या विद्यार्थ्यासोबत अनैसर्गिक कृृृृत्य मानवतेला काळीमा फासणारी घटना..!
भटक्या विमुक्तांना विविध दाखले देण्यासाठी स्वतंत्र समिती : ना. अतुल सावे
पोलीस महानिरीक्षकांनी घेतली आमदार करण देवतळे यांची भेट
राज्यस्तरीय योगासन क्रीडा स्पर्धेत नागपूर विभाग प्रथम..!
मराठा आरक्षणासावर मंत्री चंद्रकांत पाटील यांची खडसावून टीका अन् म्हणाले..!
हॉटेल मटण भाकरीच्या नावाखाली सुरू होता वेगळाच कार्यक्रम