राज्यस्तरीय योगासन क्रीडा स्पर्धेत नागपूर विभाग प्रथम..!

स्पर्धेत चित्तथरारक योगासनाचे प्रदर्शन ;नागपुर विभागाने पटकावले नऊ सुवर्ण पदक

राज्यस्तरीय योगासन क्रीडा स्पर्धेत नागपूर विभाग प्रथम..!

आधुनिक केसरी न्यूज

वरोडा : मुख्यत्वे करून महिलांनी योगासनांचा स्वीकार करावा.  जेणेकरून सक्षम कुटुंबाची निर्मिती होईल. सक्षम कुटुंबातून समाज व सक्षम समाजातून सक्षम राष्ट्र घडवता येईल असे उद्गार प्रा. श्रीकांत पाटील यांनी आनंदवनातील कार्यक्रमात बोलताना काढले.आनंदवनात आयोजित सहाव्या महाराष्ट्र राज्यस्तरीय वरिष्ठ गट योगासन क्रीडा स्पर्धेच्या समारोपप्रसंगी अध्यक्षपदावरून ते बोलत होते.

यावेळी महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.संजय मालपाणी, बृहन्महाराष्ट्र योग परिषदेचे सहकार्यवाह डॉ.अरुण खोडस्कर, महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे माजी सचिव व समन्वयक डॉ. राकेश तिवारी, राज्य संघटना सदस्य विनायक अंजनकर, जेष्ठ पंच अनिल मोहगावकर हे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.येथील आनंद निकेतन महाविद्यालय, महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशन, बृहन्महाराष्ट्र योग परिषद आणि चंद्रपूर जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 22 ते 24 ऑगस्ट दरम्यान येथील आनंदवनातील मुख्यमंत्री सभागृहात या सहाव्या महाराष्ट्र राज्यस्तरीय  योगासन क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत राज्यातील 32 जिल्ह्यातील सुमारे 180 खेळाडू ५० पंच व ३६ प्रशिक्षक हे सहभागी झाले होते. “योगासन स्पर्धेचा ऑलिंपिकमध्ये समावेश होण्यासाठी राज्य संघटना व योगासन भारत प्रयत्नशील आहेत. खेळाडूंनी विजयासाठी छोट्या चुका टाळल्या पाहिजेत.” असे मत यावेळी बोलताना डॉ. संजय मालपाणी यांनी व्यक्त केले.

या सहाव्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत नागपूर विभाग ९ सुवर्णांसह प्रथम, पुणे ५ सुवर्णांसह दुसऱ्या तर रत्नागिरी ४ सुवर्णांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिला. यावेळी पंच व मार्गदर्शकांचा सत्कार करण्यात आला. उत्कृष्ट आयोजनाबद्दल प्रा. तानाजी बायस्कर यांचा फेटा व स्वामी विवेकानंद यांची मूर्ती देऊन डॉ.संजय मालपाणी यांनी गौरव केला. या संपूर्ण स्पर्धेचे आयोजन महारोगी सेवा समिती वरोडाचे सचिव डॉ विकास आमटे, विश्वस्त कौस्तुभ आमटे, व्यवस्थापक पल्लवी आमटे , प्रा श्रीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व प्राचार्य  डॉ.मृणाल काळे त्यांच्या नेतृत्वामध्ये प्रा. तानाजी बायस्कर, जिल्हा योगासन संघटना सहसचिव सारंग धनेगांवकर, शुभांगी डोंगरवार, प्रा. संगीता बंबोडे, कोषाध्यक्ष  स्मिता रेभनकर,डॉ संतोष शर्मा, कुणाल दातारकर, तुषार पारखी, आदित्य डावे तसेच चंद्रपूर जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनचे संपूर्ण पदाधिकाऱ्यांनी व आनंद निकेतन  महाविद्यालयातील खेळाडूंनी केले.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

महालक्ष्मी पूजनाचा खरा अर्थ महालक्ष्मी पूजनाचा खरा अर्थ
आधुनिक केसरी न्यूज ज्येष्ठा गौरी आवाहन हा गणपतीमध्येच अतिशय धूमधडाक्यात साजरा होणारा उत्सव आहे. या उत्सवामध्ये गौरीची पूजा केली जाते....
माहूर तालुक्यातील एका नामांकित शाळेत सातवीच्या विद्यार्थ्यासोबत अनैसर्गिक कृृृृत्य मानवतेला काळीमा फासणारी घटना..!
भटक्या विमुक्तांना विविध दाखले देण्यासाठी स्वतंत्र समिती : ना. अतुल सावे
पोलीस महानिरीक्षकांनी घेतली आमदार करण देवतळे यांची भेट
राज्यस्तरीय योगासन क्रीडा स्पर्धेत नागपूर विभाग प्रथम..!
मराठा आरक्षणासावर मंत्री चंद्रकांत पाटील यांची खडसावून टीका अन् म्हणाले..!
हॉटेल मटण भाकरीच्या नावाखाली सुरू होता वेगळाच कार्यक्रम