सायबर भामट्याने प्राध्यापकाचे अकाऊंट केले साफ
आधुनिक केसरी न्यूज
वसमत : येथील बहिर्जी स्मारक महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ सुभाष क्षिरसागर हे नेहमी प्रमाणे आपल्या फोन पे वरुन काम करत असताना अचानक एक लिंक आली. सदरील लिंक बाजुला केली व नंतर काम आटोपून फोन बंद केला. यानंतर थोड्या वेळाने त्यांना खात्यातुन पैसे वळती झाल्याचा मेसेज आला. पण तोपर्यंत सायबर भामट्याने जवळपास १८८०००/- एक लाख अठ्ठयांशी हजार रुपये लंपास करुन गंडा घातला. गौरी गणपती सणामुळे लवकर झालेला पगार त्यांच्या अकाऊंट वर जमा होता. सदरील भामट्याने शनिवार रविवार सुट्टीचा फायदा घेत दिनांक २९ व ३१ ऑगस्ट रोजी त्यांच्या अकाऊंट मधुन वेगवेगळ्या व्यवहारा द्वारे सदरील रक्कम आपल्या केरळ येथील बॅंक खात्यात जमा केली असल्याचे बॅंक स्टेटमेंट मध्ये दिसत आहे. पण याबद्दल एकही मेसेज आला नसल्याचे त्यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. याबाबत आपण बॅंकेला सुचना केली आहे तसेच वसमत पोलीस स्टेशनमध्ये सायबर क्राईम विभागात तक्रार दाखल केली असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. सायबर क्राईमच्या माध्यमातून हे चोरटे जमापुंजी लांबवत असल्याने नागरिकांनी, ग्राहकांनी सतर्कता बाळगणे आवश्यक आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List