बीडच्या गेवराई मधील उपसरपंचाच्या प्रकरणात सर्वात मोठी अपडेट
10 दिवसांपूर्वीच गेवराई मधील वास्तूशांती झालेल्या अलिशान बंगल्यावर नर्तकीची नजर फिरली होती
आधुनिक केसरी न्यूज
महेश गायकवाड
सोलापूर : संतोष देशमुख हत्याकांडानंतर बीड पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. बीड उपसरपंच गोविंद बर्गे यांनी 9 सप्टेंबर कारमध्ये स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. दोन मुलं आणि विवाहित असून एका नर्तकीच्या प्रेमात गोविंद यांनी हे धक्कादायक पाऊल उचलले आहे या नर्तकीच्या नादात गोविंदने तिच्यावर लाखो रुपये खर्च केले आहेत. 2 लाखांचा मोबाईल त्याने या नर्तकीला भेट म्हणून दिला होता. तेवढंच नाही तर सोन्यासह महागड्या वस्तू तिला गोविंद देत होते. आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे.
नातेवाईकांनी केलेल्या आरोपानुसार नर्तकी गेवराई इथल्या प्लॉट नावावर करुन द्या या मागणीसाठी गोविंदसोबत वाद घालत होती. गोविंदला ती नर्तकी ब्लॅकमेल करत होती असा आरोप गोविंदच्या नातेवाईकांनी केला आहे. विशेष म्हणजे शहरातील माधवनगर भागात असलेल्या या घराची 10 दिवसांपूर्वीच वास्तूशांती झाली होती. याच गेवराईमधील घरासाठी उपसरपंचाचा जीव गेला असा तर्क लावला जातोय. कारण गोविंद हे घर नर्तकीच्या नावावर करण्यास तयार नव्हता. त्यामुळे नर्तकीने तिच्याशी संपर्क ठेवण्यास बंद केलं होतं. त्यासोबत मिळालेल्या माहितीनुसार तिने गोविंद यांना धमकी दिली होती की, जर हे घर माझ्या नावावर केलं नाही तर तुझ्याविरोधात बलात्काराची तक्रार करेल असं ती म्हणाली होती.
दुसरीकडे उपसरपंचाच्या भाच्याने गंभीर आरोप केले आहेत. तो म्हणाला की, माझा मामा निर्व्यसनी होता, त्यांच्याकडे पिस्तूल नव्हते, त्यांच्या गाडीमध्ये दारूच्या बाटल्या टाकण्यात आल्या आहेत. हा घातपात असल्याचा संशय आणि आरोप भाच्याने केला आहे. तसंच तो म्हणाला की गेल्या 6 महिन्यांपासून मामा मानसिक तणावात होते. दरम्यान, याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून नर्तिका पूजा गायकवाडविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. मृत गोविंद बर्गे यांच्या मेहुण्याने याबाबत तक्रार दिली आहे.
गोविंद बर्गे यांचा मृत्यू कसा झाला?
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे (वय ३४) यांचा ९ सप्टेंबर २०२५ रोजी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील सासुरे गावाजवळ एका काळ्या रंगाच्या गाडीत मृतदेह आढळला. त्यांच्या डोक्यात गोळी लागली होती आणि गाडीत पिस्तूल सापडले. प्रथमदर्शनी पोलिसांना आत्महत्या वाटते, पण नातेवाईकांनी हत्येचा संशय व्यक्त केला आहे.
गोविंद बर्गे यांच्याबद्दल काय माहिती आहे?
गोविंद बर्गे हे लुखामसला गावचे माजी उपसरपंच आणि रिअल इस्टेट व्यावसायिक होते. ते विवाहित होते आणि त्यांना दोन मुले (मुलगी आणि मुलगा) आहेत. ते गेवराईतील माधवनगर भागात एक अलिशान बंगला बांधला होता, ज्याची वास्तूशांती १० दिवसांपूर्वीच झाली होती. ते काही काळापासून मानसिक तणावात होते, असा नातेवाईकांचा दावा आहे.
पूजा गायकवाड कोण आहे आणि तिचा गोविंद यांच्याशी काय संबंध आहे? पूजा देवीदास गायकवाड (वय २१) ही सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील सासुरे गावातील रहिवासी आहे. ती थापडीतांडा येथील कला केंद्रात दीड वर्षांपासून नर्तिका म्हणून काम करते. तिची गोविंद बर्गे यांच्याशी ओळख कला केंद्रात झाली, जी मैत्रीतून प्रेमसंबंधात बदलली. गोविंद यांनी तिला लाखो रुपयांचा खर्च केला, ज्यात २ लाखांचा मोबाईल, सोन्याचे दागिने आणि महागड्या वस्तूंचा समावेश आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List