पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई स्वप्निल लोहार यांनी गळफास घेऊन केली आत्महत्या
आधुनिक केसरी न्यूज
नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस आयुक्त हद्दीतील सानपाडा पोलीस स्टेशन या ठिकाणी कार्यरत असलेले पोलीस शिपाई स्वप्निल लोहार यांनी दिनांक 11/ 9/ 2025 रोजी गुरुवारी पहाटे दोन ते साडे दोनच्या सुमारास उलवे येथील त्यांच्या राहत्या घरी घरात कोणी नसताना गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे. या घटनेने नवी मुंबई पोलीस दलात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत माहिती अशी की स्वप्निल हा नवी मुंबई पोलीस दलात पोलीस शिपाई या पदावर कार्यरत होता त्याच्या पत्नीचा आणि त्याचा किरकोळ वाद फोनवर झालेला होता अत्यंत साध्या किरकोळवादातून पोलीस शिपाई स्वप्निल लोहार यांनी इतके मोठे टोकाचे पाऊल उचलून घरात कोणी नसल्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे
दरम्यान , पोलीस शिपाई स्वप्निल लोहार यांचा स्वभाव अत्यंत शांत आणि मनमिळावू असा होता तो इतक्या टोकाचे पाऊल उचलेल असे कोणालाच वाटत नसल्याने त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बातमी कळताच मोठा धक्का बसल्याचे काही पोलिसांनी सांगितले.
पोलीस खात्यात काम करणारा कर्मचारी व अधिकारी हा अत्यंत जबाबदारीने काम करत असतो मात्र कधीकाळी कामाचा त्रास व तणावामुळे चिडचिड निर्माण होऊन साध्या किरकोळ भांडणातून देखील असे टोकाचे पाऊल उचलले जाऊ शकते. त्यामुळे असे प्रकार रोखायचे असल्यास पोलिसांना मेडिटेशनची मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे.
अनिल गायकवाड
मेडिटेशन अभ्यासक
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List