भिगवणमध्ये रील स्टार प्रतीक शिंदेच्या नव्या फॉर्च्युर्नरमुळे अपघात

भिगवणमध्ये रील स्टार प्रतीक शिंदेच्या नव्या फॉर्च्युर्नरमुळे अपघात

आधुनिक केसरी न्यूज

 निलेश मोरे

भिगवण : दि.११ नुकताच मोठा गाजावाजा करून घेतलेली फॉर्च्युर्नर गाडी आता रील स्टार प्रतीक शिंदेसाठी अडचणीची ठरली आहे. गुरुवारी सायंकाळी या गाडीने पाठीमागून दिलेल्या जोरदार धडकेमुळे भिगवण परिसरात अपघात झाला. या अपघातात तब्बल तीन गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवाने जीवितहानी टळली आहे. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये मोठी चर्चा रंगली आहे.

◆अपघाताचा थरार
फिर्यादी निखील बाळासाहेब होले (रा. अकलूज, वय 35) हे आपल्या हुंदाई क्रेटा (एम.एच. 45 ए.यु. 9779) गाडीतून प्रवास करत होते. सायं. पाचच्या सुमारास मदनवाडी, सकुंडे वस्ती जवळील ऑस्करवाडी मिसळ हॉटेलसमोर, मागून भरधाव आलेली टोयोटा फॉर्च्युर्नर (एम.एच. 42 बी.एस. 0111) जोरात धडकली.
ही गाडी चालवत होता दुसरा कोणी नसून रील स्टार प्रतीक शिंदे (रा. भादलवाडी, ता. इंदापूर, वय 24). धडकेचा जोर एवढा होता की क्रेटा पुढे असलेल्या मारुती वॅगनर (एम.एच. 12 एक्स एम. 3816) वर आदळली. काही क्षणांत तीनही गाड्या एकमेकांत आपटून मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाल्या.

◆पोलिसांत गुन्हा दाखल
या अपघातात जीवितहानी टळली असली तरी वाहनांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेवरून भिगवण पोलीस ठाण्यात गु.र. क्र. 229/2025 दाखल करण्यात आला आहे. आरोपी प्रतीक शिंदेवर भारतीय न्याय संहिता कलम 281, 324(4) तसेच मोटार वाहन कायदा कलम 184 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोहवा उगले (ब. नं. 2637) करीत आहेत.

◆स्थानिकांमध्ये चर्चा
अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नुकतीच घेतलेली फॉर्च्युर्नर अशा प्रकारे अपघाताला कारणीभूत ठरल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले. “लोकप्रियतेच्या नादात फिल्मी स्टाईलने गाडी चालवण्यावर आळा बसलाच पाहिजे,” अशी चर्चा स्थानिकांमध्ये रंगताना दिसत आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

बीडच्या गेवराई मधील उपसरपंचाच्या प्रकरणात सर्वात मोठी अपडेट  बीडच्या गेवराई मधील उपसरपंचाच्या प्रकरणात सर्वात मोठी अपडेट 
आधुनिक केसरी न्यूज महेश गायकवाड  सोलापूर : संतोष देशमुख हत्याकांडानंतर बीड पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. बीड उपसरपंच गोविंद बर्गे...
भिगवणमध्ये रील स्टार प्रतीक शिंदेच्या नव्या फॉर्च्युर्नरमुळे अपघात
मनपाच्या  दोषी अधिकाऱ्यांवर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी
पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई स्वप्निल लोहार यांनी गळफास घेऊन केली आत्महत्या
पनोरीतील वृद्ध महिलेच्या खुनातील दोन आरोपी गजाआड पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी
संविधान विरोधी जनसुरक्षा कायदा २०२४ रद्द करा..!
ओबीसी समाजाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी शासन कटिबद्ध