पनोरीतील वृद्ध महिलेच्या खुनातील दोन आरोपी गजाआड पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी
आधुनिक केसरी न्यूज
कुडूत्री : राधानगरी तालुक्यातील पनोरी गावातील वृध्द महिला श्रीमंती हरी रेवडेकर (वय ७३) यांचा तीन दिवसांपूर्वी मृतदेह मिळून आला होता.याचा सखोल तपास केला असता खून झाल्याचे निष्पन्न झाले होते. नुकतेच राधानगरी पोलिसांनी या गुन्ह्यातील गुन्हेगारांना पकडण्यात यश मिळवले, अधिक माहिती अशी श्रीमंती हरी रेवडेकर या घरी एकट्याच राहत होत्या. गुन्हेगारांनी या संधीचा फायदा आहे गणपती मिरवणूक याचा फायदा घेत अज्ञातांनी अंगावरील दागिने चोरण्याच्या हेतूने त्या महिलेचा खून करून तिला गोबर गॅस टाकीत टाकले नातेवाईकांनी व आजुबाजुच्या लोकांनी तिचा शोध घेत असताना, तिचे शव गोबरगॅसमध्ये मिळुन आले होते. या प्रेताची पहाणी केली असता, त्या वृद्धेच्या डोक्यात मारहाणीची जखमा दिसुन आल्या.. यावरुन अज्ञात व्यक्तीने कोणत्यातरी कारणास्तव तिचा खुन करुन तिचे प्रेत पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने गोबरगॅसमध्ये टाकुन दिल्याचे तपासात निष्पन्न झाले. या बाबत तिचा दत्तक पुत्र अमित हरी रेवडेकर याने राधानगरी पोलीसात तक्रार दाखल केली होती. त्यावरून राधानगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या घडलेल्या गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन कोल्हापूर जिल्हयाचे पोलीस अधीक्षक, योगश कुमार यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक, रविंद्र कळमकर यांना समांतर तपास करुन हा गुन्हा लवकरात लवकर उघडकीस आणावा आशा सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक, सागर वाघ व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस अमंलदार यांच्या पथकासह या गुन्हयाचा समांतर तपास सुरु केला.
ज्या ठिकाणी गुन्हा घडले ठिकाण व तेथील वस्तुस्थितीची पाहणी करुन, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ व त्यांच्या सोबत असले पोलीस अमंलदार सुरेश पाटील, रुपेश माने, विनोंद कांबळे, राम कोळी, रोहित मर्दाने यांचे पथकाने शोध सुरु केला. ही घटना रात्रौ १०.०० वा. ते १२.०० वा. या दरम्यान मुदतीत घडल्याचे स्पष्ट झाले. त्याच दिवशी पनोरी गावामध्ये “ग्रामीण युवा शक्ती संघटना" तसेच "पनोरीचा राजा" या दोन गणेश मंडळाची विसर्जन मिरवणुक होती. त्या दरम्यान गावातील नागरीक मिरवणुक पाहाण्या करिता गेलेले होते. या घटनेचा गुन्हा उघडकीस आणण्याकरिता कोणतेही पुरावे अथवा उपयुक्त माहिती मिळुन येत नव्हती. त्यामुळे हा गुन्हा उघडकीस येणे फार अवघड व आव्हानात्मक होते. त्यानंतर वेगवेगळी पथके तयार करुन जे लोक मिरवणुकीमध्ये गेलेले होते व ज्या लोकांचा मिरवणुकीमध्ये सहभाग दिसुन येत नव्हता अशा लोकांचा आढावा घेतला. परिसरातील सी. सी. टी. व्ही फुटेज त्याचप्रमाणे गोपनीय बातमीदार यांचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने केलेली चौकशीमध्ये एकंदरीत अभिजीत मारुती पाटील, (वय ३४) कपिल भगवान पातले (वय ३४ ) राहणार दोघेही पनोरी. तालूका. राधानगरी जिल्हा कोल्हापूर हे मिरवणुकी मधुन बाहेर गेलेले होते तसेच हा प्रकार घडले पासुन आजु बाजुच्या परिसरामध्ये ते फिरत होते तसेच व त्यांच्या नेहमीच्या वागण्यामध्ये थोडा बदल झालेला असल्याचे समजुन आले. म्हणुन त्यांची माहिती घेतली असता ते आर्थिक अडचणीमध्ये असल्याचे समजुन आले. याच संशयाचे अनुषंगाने त्यांना स्थानिक गुन्हें अन्वेषण शाखेच्या पथकाने ताब्यात घेवुन त्यांची चौकशी केली असता त्यानी हा खुन आपण केल्याची कबुली दिली. त्या दोघांचेकडे या खूनाबाबत अधिक चौकशी केली असता ते दोघे ही बालपणीचे मित्र असुन ते दोघेही आर्थिक अडचणीत असल्याने त्यां दोघांना पैशाची नितांत गरज होती. म्हणुन त्यांनी ती वृध्द महिला घरामध्ये एकटीच असते व तिच्या अंगावर दागिणे असतात याची त्यानां पुर्ण माहिती होती. म्हणुन तिचे अंगावरील दागिणे लुटण्याचा गेल्या एक महिन्या पुर्वी कट रचला होता गुन्ह्यातील दोघांना राधानगरी पोलीसांच्या ताब्यात दिले असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष गोरे पोलीस करीत आहेत.
या घटनेचा तपास पोलीस अधीक्षक, योगेश कुमार" अपर पोलीस अधीक्षक धिरजकुमार बच्चु" उप विभागीय पोलीस अधिकारी शाहुवाडी विभागाचे आप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, राधानगरी चे पोलीस कळमकर, राधानगरी चे पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ,"" पोलीस अमंलदार सुरेश पाटील, रुपेश माने, राम कोळी, विनोद कांबळे, रोहित मर्दाने, संजय देसाई, अमित सर्जे, राजु कांबळे, विजय इंगळे, राजेंद्र वरांडेकर, हंबिरराव अतिग्रे, प्रदिप पाटील तसेच राधानगरी पोलीस ठाणे कडील पोलीस उप निरीक्षक प्रणाली पोवार, पोलीस अमंलदार कृष्णा खामकर," शेळके, “सुदर्शन पाटील, कोळी, रघु पोवार, देसाई, यांनी केला आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List