गणेश विसर्जनच्या पूर्वसंध्येला पुण्यात गोळीबार नाना पेठेत तरुणाची हत्या

आधुनिक केसरी न्यूज

  रोहित दळवी

पुणे : पुण्याच्या गुन्हेगारी जगतात आंदेकर कुटुंबाचा रंक्तरंजित इतिहास पाच दशकांहून अधिक जुना आहे. गेल्या वर्षी 1 सप्टेंबर 2024 रोजी माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची गोळ्या झाडून व कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली होती. त्यावेळीच विरोधी टोळीतील गँगवॉर भडकण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. वनराज आंदेकर हत्येच्या प्रकरणात प्रमुख आरोपी सोमनाथ गायकवाड व इतरांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली असून ते सध्या तुरुंगात आहेत. तरीदेखील त्यांच्या टोळीने बदला घेण्यासाठी योजना आखल्याची माहिती समोर येत आहे.

बदला घेण्याचा कट आणि पुण्यातील टोळीयुद्ध
माहितीनुसार, गायकवाड टोळीने आंदेकर गटाविरोधात कारवाई करण्याची तयारी सुरू ठेवली होती. काही दिवसांपूर्वी कात्रज भागात सोमनाथ गायकवाडच्या मुलावर हल्ला करण्याचा कट रचण्यात आला होता, मात्र पोलिसांनी तो उधळून लावला. तरीदेखील बदला घेण्याच्या तयारीमुळे नाना पेठेतील गोळीबार घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. 2023 मध्ये आंदेकर गटाने शुभम दहिभाते व निखील आखाडेवर हल्ला केला होता. त्यात निखीलचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून दोन्ही टोळ्यांमध्ये वैर अधिक चिघळले. त्याचा परिणाम म्हणूनच गेल्या वर्षी वनराज आंदेकर यांचा खून झाला आणि आता पुन्हा कोमकरवर प्राणघातक हल्ला झाल्याचे उघड झाले आहे.

या घटनेनंतर पुणे पोलिसांनी परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला असून, गुन्हे शाखा तपासाला लागली आहे. शहरातील वाढत्या गँगवॉरमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.कोमकर स्वतःही गुन्हेगारी प्रकरणात आरोपी होता आणि काही काळ तुरुंगात राहिला होता.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

वाघाने केला शेतकऱ्यावर हल्ला..! वाघाने केला शेतकऱ्यावर हल्ला..!
आधुनिक केसरी न्यूज गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या पळसगाव भदूटोला शेत शिवारात पट्टेदार वाघ दिसून आला  शेती...
शक्तिपीठ महामार्गाचे अग्रणी नदीत केले विसर्जन..!
पुनर्वसीत लिंबायतवासीय भोगात आहेत नरक यातन चाळीस वर्ष होऊनही मूलभूत सुविधा पासून वंचित
गणेश विसर्जनच्या पूर्वसंध्येला पुण्यात गोळीबार नाना पेठेत तरुणाची हत्या
मंत्री प्रताप सरनाईक यांनी खरेदी केली देशातील पहिली टेस्ला कार
बेकायदेशीर काम रोखणाऱ्या महिला IPS अधिकाऱ्याला धमकी देणा-या उपमुख्यमंत्री अजित पवारांची टगेगिरी कायम : अतुल लोंढे
पेठ तालुक्यात उस्थळे येथे बिबट्याचा थरार संपला ३६ तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर यश