पुनर्वसीत लिंबायतवासीय भोगात आहेत नरक यातन चाळीस वर्ष होऊनही मूलभूत सुविधा पासून वंचित

रस्ते नाल्या नसल्याने सरपटणारे प्राणी डास वाढले निमोनियाच्या साथीने गावकरी हैराण

पुनर्वसीत लिंबायतवासीय भोगात आहेत नरक यातन चाळीस वर्ष होऊनही मूलभूत सुविधा पासून वंचित

आधुनिक केसरी न्यूज

लक्ष्मीकांत मुंडे 

श्रीक्षेत्र माहूर : माहूर तालुक्यातील माहूर शहरापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेले राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले पुनर्वसित गाव मौजे लिंबायत येथे शासनाकडून कुठल्याही सुविधा मिळाल्या नसल्याने आज घडीला लिंबायात गावातील अंतर्गत रस्त्यात चिखलाचे साम्राज्य झाले असूनडास आणि सरपटणाऱ्या प्राण्यांचा प्रादुर्भाव वाढल्याने निमोनियाची साथ पसरली असून गावातील नागरिक  पुनर्वशीत गावाला सवती सारखी वागणूक मिळत असल्याने विकास कामाबाबत होत असलेल्या दुजा भावामुळे दुःखी झालेले दिसत असून याबाबत कारवाई न झाल्यास उपोषणाचा मार्ग अवलंबवीला जाईल असा इशारा कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य जयकांत मोरे पाटील यांनी दिला आहे

मोजे लिंबायत गावात सात सदस्य असलेली ग्रामपंचायत असून गेल्या 40 वर्षांपूर्वी पुनर्वसन झालेल्या गावात रस्ते नाल्या लाईट्स पिण्याचे पाणी या सर्व बाबतीतच कुठलीच प्रगती झाली नसल्याने गावात राहत असलेल्या दोन पिढ्या अंधारात दूषित पाणी पिऊन चिखल माती तुडवत म्हाताऱ्या झालेल्या आहेत जानेवारी महिन्यात गावातील रस्ते बनविण्यासाठी ढब्बर टाकण्यात आले त्याचे ढीगारे तसेच असल्याने अनेक नागरिकांनी स्वतः रस्त्यावर पसरविले परंतु पावसाळ्यात चिखल झाल्याने यावर शेवाळ होऊन त्यात सरपटणारे प्राणी आणि डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने गावात निमोनियाची सात पसरली आहे तर गणेश विसर्जन मिरवणुकीतही प्रचंड अडथळे आल्याने गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली 
कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य जयकांत मोरे पाटील यांनी अनेक वेळा पंचायत समिती ग्रामपंचायतला अर्ज करूनही एकाही कामाला गती दिली गेली नसल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत असल्याने नागरिकांनी ग्रामपंचायत पंचायत समितीच्या निषेध व्यक्त करून तहसीलदार अभिजीत जगताप गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस यांनी पाहणी करावी आणि गावातील रस्ते नाल्या लाईट पिण्याचे शुद्ध पाणी यासाठी तत्काळ बनविण्याबाबत उपाययोजना करण्याची मागणी केली असून तात्काळ कारवाई न झाल्यास उपोषणाचा मार्ग अवलंबिला जाईल असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

वाघाने केला शेतकऱ्यावर हल्ला..! वाघाने केला शेतकऱ्यावर हल्ला..!
आधुनिक केसरी न्यूज गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या पळसगाव भदूटोला शेत शिवारात पट्टेदार वाघ दिसून आला  शेती...
शक्तिपीठ महामार्गाचे अग्रणी नदीत केले विसर्जन..!
पुनर्वसीत लिंबायतवासीय भोगात आहेत नरक यातन चाळीस वर्ष होऊनही मूलभूत सुविधा पासून वंचित
गणेश विसर्जनच्या पूर्वसंध्येला पुण्यात गोळीबार नाना पेठेत तरुणाची हत्या
मंत्री प्रताप सरनाईक यांनी खरेदी केली देशातील पहिली टेस्ला कार
बेकायदेशीर काम रोखणाऱ्या महिला IPS अधिकाऱ्याला धमकी देणा-या उपमुख्यमंत्री अजित पवारांची टगेगिरी कायम : अतुल लोंढे
पेठ तालुक्यात उस्थळे येथे बिबट्याचा थरार संपला ३६ तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर यश