लोह्यात दोन गावठी पिस्तूलसह चौदा जिवंत काडतूस जप्त ; दोघांना अटक

स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही तर लोहा पोलिस अनभिज्ञ

लोह्यात दोन गावठी पिस्तूलसह चौदा जिवंत काडतूस जप्त ; दोघांना अटक

आधुनिक केसरी न्यूज

लोहा : मागील कांहीं दिवसांपासून लोहा शहर गुन्हेगारीचे केंद्र बनत चालल्याचे अनेक घटनेवरून समोर येत आहे. आजघडीला लोहा शहरातील अवैद्य धंद्यांनी मोठ्या प्रमाणात डोके वर काढले असून स्थानिक पोलिस प्रशासन यावर अंकुश लावण्यास अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे. अनधिकृत गावठी पिस्तूल व काडतूस विक्री करण्याच्या उद्देशाने मिळून आल्यावरून आरोपींना मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले. एवढी मोठी कार्यवाही लोहा शहरात होत असताना लोहा पोलिसांना याचा साधा मागमूसही नाही. याबद्दल सर्वसामान्यातून आश्चर्य व्यक्त होत आहे. मात्र स्थागुशा कडून सदरील कार्यवाही लोहा शहरातील शनिमंदिर परिसर येथे करण्यात आली.
सद्यस्थितीस लोहा शहर हे अनधिकृत व्यवसाय व गुन्हेगारीचे प्रमुख केंद्र बनत चालल्याचे चित्र आहे. लोहा शहरातील शनिमंदिर परिसरात गावठी पिस्तूल विक्री करण्यासाठी आलेल्या दोन जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले असून त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तूल व चौदा जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केले. स्थागुशाचे पोलिस उपनिरीक्षक मिलिंद सोनकांबळे यांच्या फिर्यादीनुसार आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना खबऱ्या मार्फत गोपनीय माहिती मिळाल्यावरून जिल्हा पोलिस अधीक्षक अबिनाशकुमार, अप्पर पोलिस अधीक्षक सूरज गुरव यांच्या सूचनेनुसार स्थागुशाचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलिस उपनिरीक्षक मिलिंद सोनकांबळे यांच्या नेतृत्वाखालील रविशंकर बामणे, चंद्रकांत स्वामी, अझरूद्दीन शेख, अनिल बिरादार, सायबर सेलचे राज सिटीकर, दीपक ओढणे आदींच्या पोलिस पथकांनी लोहा शहरातील शनि मंदिर परिसरात सापळा लावून आरोपी आनंद उर्फ चिनू सरदार यादव रा. वजिराबाद, नांदेड व जावेद उर्फ लड्या रहमत शेख रा. विष्णुपुरी, नांदेड यांना ताब्यात घेऊन त्यांची झाडाझडती घेतली असता त्यांच्याकडून २ गावठी पिस्तूल व १४ जिवंत काडतूस तसेच दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. त्यांची अधिक चौकशी केली असता पिस्तूल विक्रीसाठी घेऊन आल्याचे आरोपींनी सांगितले. सदरील कार्यवाहीत २ लाख ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदरील आरोपी ही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून आरोपी हे लोहा शहरात मागील कांहीं दिवसांपासून शहरातील मुख्य वसाहतीच्या ठिकाणी वास्तव्यास होते. परंतु सदरील प्रकार लोहा पोलिसांना कसा माहिती नाही. याबद्दल आश्चर्य व्यक्त होत असून लोहा पोलिस ठाणे हद्दीतील वाढती गुन्हेगारी, वाढते अवैद्य व्यवसाय, चिडीपत्ता, खिसेकापू, मोबाईल चोरटे, गुटखा, रेती वाहतूक आदींवर जिल्हा पोलिस अधीक्षकांनी स्वतःच लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा लोह्याचा बिहार होण्यास वेळ लागणार नसल्याची चर्चा सर्वसामान्य लोहेकरांतून होत आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

शक्तिपीठ महामार्गाचे अग्रणी नदीत केले विसर्जन..! शक्तिपीठ महामार्गाचे अग्रणी नदीत केले विसर्जन..!
आधुनिक केसरी न्यूज सचिन सरतापे म्हसवड : गव्हाण येथील अग्रणी नदीत शक्तिपीठ महामार्ग भ्रष्टाचाराचे गाठूड. प्रतीकात्मक पुतळ्याचे विसर्जन करण्यात आले...
पुनर्वसीत लिंबायतवासीय भोगात आहेत नरक यातन चाळीस वर्ष होऊनही मूलभूत सुविधा पासून वंचित
गणेश विसर्जनच्या पूर्वसंध्येला पुण्यात गोळीबार नाना पेठेत तरुणाची हत्या
मंत्री प्रताप सरनाईक यांनी खरेदी केली देशातील पहिली टेस्ला कार
बेकायदेशीर काम रोखणाऱ्या महिला IPS अधिकाऱ्याला धमकी देणा-या उपमुख्यमंत्री अजित पवारांची टगेगिरी कायम : अतुल लोंढे
पेठ तालुक्यात उस्थळे येथे बिबट्याचा थरार संपला ३६ तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर यश
लोह्यात दोन गावठी पिस्तूलसह चौदा जिवंत काडतूस जप्त ; दोघांना अटक