पेठ तालुक्यात उस्थळे येथे बिबट्याचा थरार संपला ३६ तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर यश

पेठ तालुक्यात उस्थळे येथे बिबट्याचा थरार संपला ३६ तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर यश

आधुनिक केसरी न्यूज

पेठ : पेठ तालुक्यातील उस्थळे शिवारात गेल्या महिनाभरापासून बिबट्याचा मोठ्या प्रमाणात त्रास सुरू होता. ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी वनपरिक्षेत्र कार्यालयाला नागरिकांनी तातडीने कार्यवाही करण्याची विनंती केली होती. त्यानंतर वन विभागाकडून सतत जनजागृती मोहिमा राबविण्यात आल्या. सदर बिबट्या वारंवार लोकवस्तीकडे येत असल्याचे जीपीएस कॅमेऱ्यांच्या माध्यमातून स्पष्ट झाले. त्यानंतर ३ सप्टेंबर रोजी पिंजरा लावण्यात आला. अखेर ४ सप्टेंबर रोजी पहाटे तीनच्या सुमारास अंदाजे तीन वर्षांचा बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. योगेश साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. रेस्क्यू टीमसोबत वनपरिमंडळ अधिकारी मा. तानाजी भोये, वनरक्षक मजहर शेख, दिलशाद पठाण, भरत चौधरी, कुसुम गवळी तसेच गावकऱ्यांनी उत्स्फूर्त सहकार्य केले. तब्बल ३६ तास चाललेल्या या रेस्क्यू ऑपरेशनमुळे उस्थळे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

वाघाने केला शेतकऱ्यावर हल्ला..! वाघाने केला शेतकऱ्यावर हल्ला..!
आधुनिक केसरी न्यूज गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या पळसगाव भदूटोला शेत शिवारात पट्टेदार वाघ दिसून आला  शेती...
शक्तिपीठ महामार्गाचे अग्रणी नदीत केले विसर्जन..!
पुनर्वसीत लिंबायतवासीय भोगात आहेत नरक यातन चाळीस वर्ष होऊनही मूलभूत सुविधा पासून वंचित
गणेश विसर्जनच्या पूर्वसंध्येला पुण्यात गोळीबार नाना पेठेत तरुणाची हत्या
मंत्री प्रताप सरनाईक यांनी खरेदी केली देशातील पहिली टेस्ला कार
बेकायदेशीर काम रोखणाऱ्या महिला IPS अधिकाऱ्याला धमकी देणा-या उपमुख्यमंत्री अजित पवारांची टगेगिरी कायम : अतुल लोंढे
पेठ तालुक्यात उस्थळे येथे बिबट्याचा थरार संपला ३६ तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर यश