मंत्री प्रताप सरनाईक यांनी खरेदी केली देशातील पहिली टेस्ला कार

मंत्री प्रताप सरनाईक यांनी खरेदी केली देशातील पहिली टेस्ला कार

आधुनिक केसरी न्यूज

मुंबई : (५सप्टेंबर) भारतात 15 जुलै रौजी दिमाखात टेस्ला कार (Tesla Car) दाखल झाली. 15 जुलै रोजी मुंबईतील बीकेसी येथे टेस्लाचं शोरुम लॉन्च करण्यात आला. यानंतर आजपासून (5 सप्टेंबर) टेस्लाची गाडी वितरित करण्याची प्रक्रिया कंपनीकडून सुरू करण्यात आली आहे. देशातील टेस्लाची पहिली कार महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी खरेदी केली. दरम्यान, देशातील टेस्लाची पहिली गाडी मीच खरेदी करणार, असा निर्धार प्रताप सरनाईकांनी व्यक्त केला होता. त्यानंतर आज प्रताप सरनाईकांनी टेस्लाची कार खरेदी केली.

भारतातील सर्वात पहिली टेस्ला कार मला विकत घेता आली, याचा मला अभिमान आहे. महत्वाचे म्हणजे ही टेस्ला कार कोणतेही डिस्काऊंट न देता पूर्ण पैसे भरून मी विकत घेतली आहे, अशी माहिती प्रताप सरनाईकांनी दिली. तसेच टेस्लाची ही कार मी माझ्या मुलाला नाही तर माझ्या नातवाला देत आहे, कारण तो शाळेत ही कार घेऊन जाईल आणि सर्वांना पर्यावरणपूरक कारचा संदेश देईल, असं प्रताप सरनाईक म्हणाले. दरम्यान, जगातील अत्याधुनिक आणि सुरक्षित कार म्हणून टेस्ला ओळखली जाते.
Tesla Y Model Car: टेस्लाच्या इलेक्ट्रिक कारची वैशिष्ट्य---

1. टेस्ला कंपनीची 3 RWD या मॉडेलची कार अवघ्या 5.6 सेकंदात शून्य ते 100 इतका वेग गाठू शकते. 

2. Tesla 3 LR RWD ही कार एकदा चार्ज केल्यानंतर 622 किलोमीटर अंतरापर्यंत प्रवास करु शकते.

3. टेस्लाची स्टँटर्ड RWD व्हर्जनची कार एकदा चार्ज केल्यानंतर 500 किलोमीटर अंतरापर्यंत प्रवास करु शकते.

4. नवीन Model Y मध्ये बाह्य व आतील रचनेत बदल करण्यात आले असून, आता मागील सीटसाठी स्वतंत्र टचस्क्रीन आणि इलेक्ट्रिक अॅडजस्टेबल फंक्शनदेखील देण्यात आले आहेत. 

5. Model Y ही टेस्लाची सर्वाधिक विक्री होणारी कार आहे आणि जगभरातही ती सर्वोच्च विक्री होणाऱ्या कार्सपैकी एक आहे. 

6. Model Y ची स्पर्धा BMW X1 LWB, Volvo C40, BYD Sealion 7, आणि Mercedes-Benz EQA यांच्याशी होणार आहे. भारतात ही कार पूर्णपणे आयात (CBU) करून आणली जात असल्यामुळे किंमतीत वाढ झालेली आहे.

Tesla Y Model LR RWD Car: टेस्ला कारच्या कोणत्या रंगासाठी किती जास्तीचे पैसे मोजावे लागणार?

टेस्लाच्या Model Y च्या RWD व्हर्जनची किंमत ₹61.07 लाख असून, LR RWD व्हर्जनसाठी ही किंमत ₹69.15 लाख इतकी आहे. यानंतर आपल्या आवडीचा रंग हवा असल्यास त्यासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागतील.

स्टेल्थ ग्रे-

पर्ल व्हाइट मल्टी-कोट (₹95,000 अतिरिक्त)

डायमंड ब्लॅक (₹95,000 अतिरिक्त)

ग्लेशियर ब्लू (₹1,25,000 अतिरिक्त)

क्विक सिल्व्हर (₹1,85,000 अतिरिक्त)

अल्ट्रा रेड (₹1,85,000 अतिरिक्त)

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

वाघाने केला शेतकऱ्यावर हल्ला..! वाघाने केला शेतकऱ्यावर हल्ला..!
आधुनिक केसरी न्यूज गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या पळसगाव भदूटोला शेत शिवारात पट्टेदार वाघ दिसून आला  शेती...
शक्तिपीठ महामार्गाचे अग्रणी नदीत केले विसर्जन..!
पुनर्वसीत लिंबायतवासीय भोगात आहेत नरक यातन चाळीस वर्ष होऊनही मूलभूत सुविधा पासून वंचित
गणेश विसर्जनच्या पूर्वसंध्येला पुण्यात गोळीबार नाना पेठेत तरुणाची हत्या
मंत्री प्रताप सरनाईक यांनी खरेदी केली देशातील पहिली टेस्ला कार
बेकायदेशीर काम रोखणाऱ्या महिला IPS अधिकाऱ्याला धमकी देणा-या उपमुख्यमंत्री अजित पवारांची टगेगिरी कायम : अतुल लोंढे
पेठ तालुक्यात उस्थळे येथे बिबट्याचा थरार संपला ३६ तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर यश